स्टँडअप-कॉमेडियन व अभिनेता वीर दास हा सतत चर्चेत असतो. सध्या तो चित्रपटांपासून लांब असला तरीही तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. कॉमेडी व्हिडीओ, लाइव्ह, फिरण्याचे फोटो तो सोशल मीडियावर सतत आपलोड करत असतो. आपल्या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेजण हैराण झाले आहेत. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकताच नेटकऱ्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. (vir das viral post)
वीर दासने एक व्हिडीओ आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर वर शेअर केला आहे. यामध्ये तो बाथरुममध्ये गेला असता छतावरुन खाली पडताना दिसला. त्याने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, “मी जेव्हा रात्री बाथरुममध्ये गेलो तेव्हा मला समोरुन साप खाली पडताना दिसला. तो सरळ फ्लश हँडलजवळ असलेल्या टाकीवर पडला. ते बघून मी इतका घाबरलो की मी आता पुन्हा बाथरुममध्ये जाणार नाही”.
At an eco resort for the night because we’re shooting nearby. Needed to take a piss. Opened up the bathroom door, stood over the pot, junk out, and before I began…a snake fell from the ceiling directly on to the water tank near the flush handle. Yup. Never peeing again 👍 pic.twitter.com/OnqX05HJPj
— Vir Das (@thevirdas) April 10, 2024
त्याने व्हिडीओ शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “ज्यामध्ये कीडे, साप, वाटवाघूळ असतात अशा ईको ठिकाणी राहायला आवडत नाही”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “मी कधीही ईको रिसॉर्टमध्ये जाणार नाही”, तिसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “तुम्ही ठीक असाल अशी आशा करतो. कारण हे सगळं वाचल्यानंतर मी अजूनही सावरलो नाही”.
वीर दास एक उत्तम कॉमेडियन असण्याबरोबरच एक उत्तम अभिनेतादेखील आहे. त्याने आतापर्यंत ‘नमस्ते लंडन’, ‘बदमाश कंपनी’, ‘गो गोवा गॉन’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘दिल्ली बेली’, ‘लव्ह आज कल’, ‘शिवाय’ या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या होत्या. २०२२ साली तो ‘द बबल’ या चित्रटपटामध्ये दिसून आला होता. सध्या मिळालेल्या माहितीनुसार तो अनन्या पांडेबरोबर ‘कॉल मी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
२० नोव्हेंबर रोजी त्याला न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स २०२३ साली नेटफ्लिक्स शो ‘वीर दास लॅंडींग’साठी बेस्ट कॉमेडी सिरिजचा इंटरनॅशनल एमी अवॉर्ड मिळाला होता.