सध्या मनोरंजनसृष्टीत येणाऱ्या नव्या नाटक, मालिका, चित्रपट यांच्या सोबतच या मध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या लग्नाची सुद्धा चांगलीच चर्चा होताना दिसते. रुपेरी पडद्यावर होणारी कळकरांनी लग्न प्रेक्षकांना हवी हवीशी असतातच पण त्याच बरोबर खऱ्या आयुष्यात ही आपला आवडता कलाकार कोणासोबत लग्न बंधनात अडकतोय हे पाहण्यास उत्सुक असतात.(Akash Thosar wedding)
सध्या सोशल मीडिया वर एका अभिनेत्याचा असाच एक लग्नातला लुक व्हायरल होताना दिसतोय. सैराट या चित्रपटातून घराघरात पोहचलेला परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर याने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून नवरदेवाच्या लुक मध्ये एक फोटो पोस्ट केला आहे आणि कॅप्शन मध्ये त्याने लिहिलं आहे ‘जमलंय बर का यायला लागतंय १० दिवस बाकी.
त्याच्या या पोस्ट वर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स देखील केल्या आहेत.
=====
हे देखील वाचा – ‘..म्हणून अशोक सराफ यांनी त्यांच्या मुलाशी धरला होता अबोला’
=====
काही चाहत्यांनी नक्की येणार असं लिहिलंय तर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. परंतु तूर्तास तरी आकाशच्या लग्नाची ही तयारी नाही असं त्याने कॅप्शन मध्ये मेंशन केलेल्या हॅशटॅग वरून दिसतंय त्याने टॅग्स मध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचा म्हणजेच घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाचा हॅशटॅग ही मेंशन केला आहे तर हा त्याचा चित्रपटातील लुक असल्याचं ही बोललं जातंय. तर नक्की हा विषय आहे तरी काय हे १० दिवसांमध्ये कळेल.

नागराज आण्णांची मनोरंजनाची बिरयाणी
या आधी आकाश ठोसर ने साकारलेली सैराट या ब्लॉकबस्टर चित्रपटातील परश्या ही भूमिका आज ही नावाजली जाते. त्यानं नंतर त्याने नागराज मंजुळे यांच्यासोबतच झुंड या चित्रपटात ही काम केले त्या चित्रपटातला हे प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं तर झुंड आणि सैराट च्या यशानंतर नागराज मंजुळे हे नवीन कलाकृतीसह पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आगमन करत आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या या आगामी बहुचर्चित चित्रपटात सुद्धा आकाश ठोसर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Akash Thosar wedding)

‘घर बंदूक बिरयाणी’ असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे.
आकाश सोबतच या चित्रपटात खुद्द नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, सायली पाटील असे अन्य कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ७ एप्रिल पासून ‘घर बंदूक बिरयाणी’ या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.