बुधवार ३ एप्रिल रोजी तैवानला भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. तब्बल ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे देशातील कित्येक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या भूकंपाची भीषणता एवढी होती, की कित्येक मोठमोठ्या इमारती हा भूकंप सुरु असताना क्षणार्धात जमिनीवर कोसळल्या. हा भूकंप तैवानमधील गेल्या २५ वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे म्हटले गेले. या भूकंपानंतर शेजारील देश जपान सतर्क झाला आणि त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लोकांना सखल भाग सोडून उंच ठिकाणी जाण्यासही सांगण्यात आलं.
या भूकंपामध्ये लोक आपला जीव वाचताना दिसले. याचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आलेले पाहायला मिळाले. अशातच या भूकंपाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका रुग्णालयातील आहे. तैवानमध्ये भूकंप आला असताना रुग्णालयात काय परिस्थिती होती. हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. तसेच या भूकंपाची भीषणताही पाहायला मिळत आहे. हा भूकंप आला असताना रुग्णालयातील नर्सेसनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळांचं रक्षण केलं. या प्रसंगाचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे.
भूकंपाचे धक्के जाणवताच तिथे काम करणाऱ्या नर्स ताबडतोब खोलीत येतात जिथे नवजात बालकांना ठेवले जाते. त्या खोलीत आधीच तीन परिचारिका हजर असून त्या मुलांचे प्राण वाचवत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. भूकंपाचे धक्के बसताच दुसरी एक परिचारिका धावत धावत येते आणि मुलांना एकत्र आणण्यास मदत करू लागते. भूकंपामुळे संपूर्ण रुग्णालय हालत असताना त्या परिचारिका स्वत:च्याज जीवाची पर्वा न करता त्या बाळांचे जीव वाचवतात. दरम्यान, या भूकंपाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अशातच या तीन परिचारिकांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच सोशल मीडियावर या व्हिडीओमधील तीन परिचारिका महिलांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी “तैवानमध्ये अजूनही मानवता अस्तित्वात आहे. या परिचारिकांचा आदर आहे. खरंच यांनी स्वत:ची पर्वा न करता केलेल्या या कृतीसाठी या सर्व परिचारिका प्रेम व कौतुकास पात्र आहेत” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.