रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझी पँटच मी घरी विसरलो अन्…”, मंचावर एन्ट्री करण्यापूर्वीच मृणाल कुलकर्णींच्या लेकाची तारांबळ, म्हणाला, “पँट घालत घालत…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 4, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Virajas Kulkarni narrated a funny incident where his pants were left at home during a play.

"माझी पँटच मी घरी विसरलो अन्...", मंचावर एन्ट्री करण्यापूर्वीच मृणाल कुलकर्णींच्या लेकाची तारांबळ, म्हणाला, "पँट घालत घालत..."

व्यावसायिक रंगभूमीकडे जाण्याचा एक मार्ग म्हणून प्रायोगिक नाटकांकडे बघितलं जातं. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी ही प्रायोगिक व व्यावसायिक नाटकं करत मालिका किंवा चित्रपटांकडे वळतात. असाच एक अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी. ‘माझा होशील ना?’ या लोकप्रिय मालिकेतून विराजसने प्रेक्षकांच्या मनात घर केले. यानंतर त्याने काही चित्रपटांतदेखील अभिनय केला. मात्र त्याचा हा प्रवास प्रायोगिक नाटकांपासून सुरु झाला आहे.

प्रायोगिक नाटक म्हटलं की गडबड, गोंधळ करत प्रयोग सादर करणं हे आलंच. अनेक कलाकार मंडळी या प्रवासातून जात असतात आणि यादरम्यान अनेक गंमती-जमती, किस्से हे होतंच असतात. असाच प्रायोगिक नाटकादरम्यानचा एक किस्सा विराजसने शेअर केला आहे नुकत्याच पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याच्या निमित्ताने विराजसने त्याचा एक गंमतीशीर किस्सा शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटकक्षेत्रात मोठं पाऊल, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “वडिलांना अभिमान वाटेल असं…”

माझं पहिलं प्रयोगिक बालनाट्यात मी चार्ली चॅप्लिनची भूमिका करत होतो. तेव्हा एका प्रयोगाला दिग्दर्शकाची तब्येत बरी नसल्यामुळे तो थेट प्रयोगाला येणार होतो. तेव्हा तो प्रयोग सहा वाजता होता आणि पावणे सहा वाजले तरी आम्ही  अजून पोहोचलो नव्हतो. त्यामुळे आम्ही कसं तरी करुन पहिल्या अंकांचा सेट उभा केला आणि दिग्दर्शकाला सेट लावून झाला आहे असं सांगितलं आणि कसा बसा प्रयोग सुरु केला.”

आणखी वाचा – Video : “तापमानात घट झाली की मनस्थितीवर परिणाम…”, बर्फामध्ये बायको गाणं गात नाचताना सुबोध भावेने शूट केला व्हिडीओ, म्हणाला, “हा पुरावा…”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “या नाटकात माझी चार्ली चॅप्लिनची महत्त्वाची भूमिका असून मी प्रेक्षकांमधून एंट्री घेणार होतो. पण त्याआधी माझ्या लक्षात आलं की, नाटकाच्या धावपळीमध्ये मी माझी पँट घरीच विसरलो आहे. अवघ्या काही मिनिटांनी माझी एंट्री होणार होती. म्हटलं आता काही खरं नाही, शॉर्ट पँटवरच मला आता प्रयोग करावा लागणार की काय?. मग मी प्रेक्षागृहाच्या बाहेर प्रेक्षकांच्या मागे उभा असताना माझा एक मित्र माझी पँट घेऊन आला. मग मी पँट घालत-घालत एंट्री केली आणि तो प्रयोग यशस्वी पार पडला.”       

Tags: marathi actormarathi entertainment newsvirajas kulkarni
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
today 05 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशी भविष्य : आज शुभ योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अगदी खास, मेष ते मीन राशीपैकी कुणावर असणार लक्ष्मीची देवीची कृपा?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.