शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “तापमानात घट झाली की मनस्थितीवर परिणाम…”, बर्फामध्ये बायको गाणं गात नाचताना सुबोध भावेने शूट केला व्हिडीओ, म्हणाला, “हा पुरावा…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 4, 2024 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Subodh Bhave shared a video of his wife Manjiri enjoying in the Kashmir’s snow

Video : "तापमानात घट झाली की मनस्थितीवर परिणाम...", बर्फामध्ये बायको गाणं गात नाचताना सुबोध भावेने शूट केला व्हिडीओ, म्हणाला, "हा पुरावा..."

नाटक, मालिका व चित्रपट मनोरंजनाच्या या तीनही माध्यमांत अभिनयाची मुशाफिरी करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे.  विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता उत्तम दिग्दर्शकदेखील आहे. आपल्या अभिनय व दिग्दर्शनाने चर्चेत राहणारा सुबोध हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेता सध्या त्याच्या व्यस्ततेतून वेळ काढत कुटुंबियांबरोबर फिरायला गेला आहे. भावे कुटुंब सहपरिवार काश्मीर दौऱ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. या दौऱ्याचे काही खास फोटो व व्हिडीओ शेअर करत आहेत. सुबोधने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची पत्नी आणि दोन मुलं दिसत आहेत. सुबोधची दोन्ही मुलं कान्हा व मल्हारही या फोटोंमध्ये धमाल, मजामस्ती करताना दिसत आहेत. अशातच सुबोधची पत्नी मंजिरीचा एक धमाल व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये तीही मजामस्ती करताना पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

आणखी वाचा – “फॉलोअर्स पाहून काम गेलं अन्…”, योगेश शिरसाट यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “चित्रीकरणाच्या दोन दिवसांपूर्वी…”

सुबोधने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे मंजिरीचा धमाल व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये ती बर्फामध्ये मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. मंजिरी भावे या व्हिडीओमध्ये बर्फामध्ये नाचत नाचात “में चली बन के हवा” हे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील आशा भोसले यांनी गायलेलं गाणं गात आहे. या खास व्हिडीओला सुबोधने “तापमानात घट झाली की त्याचा परिणाम मनस्थितीवर होतो त्याचा हा पुरावा” असं मजेशीर कॅप्शनदेखील दिलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये सुबोधही पत्नीसह एन्जॉय करताना दिसत आहे.

आणखी वाचा – श्रवण नक्षत्रातील सिद्ध योगामुळे ‘सिंह’ व ‘तूळ’ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होणार, इतर राशींच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

दरम्यान, सुबोधने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांसह अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक कलाकार मंडळींनीदेखील या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. श्रुती मराठे, बेला शेंडे, अभिज्ञा भावे, रश्मी अनपट, सुकन्या मोने, गुरु दिवेकर आदी कलाकारांनी या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.         

Tags: marathi actorsubodh bhave
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Chetana Bhatt New Car

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटने खरेदी केली महागडी कार, पोस्ट शेअर केल्यानंतर कलाकारांकडूनही कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.