‘बाहुबली’, ‘RRR’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या एस.एस.राजामौली हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. शांत स्वभावाचे राजामौली हे नेहमी आपल्या आपल्या कामाने सर्वांची मनं जिंकतात. त्यांच्या ‘RRR’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. ‘बाहुबली’प्रदर्शित होण्याआधी प्रमोशन दरम्याने थोडाफार त्यांचा मस्तीखोर अनुभव सर्वांनी अनुभवला होता मात्र आता त्यांचा भन्नाट अंदाज पाहायला मिळत आहे. नुकताच सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्या पत्नीबरोबर दिसत आहेत. (S.S. Rajamauli dance with wife)
व्हायरल झालेला सदर व्हिडीओ हा लग्नसमारंभातील आहे. यामध्ये राजामौली आपली पत्नी रमाबरोबर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते ए. आर. रहमान यांच्या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. सुरुवातीचे काही सेकंद राजामौली एकटे एकटे नाचत होते मात्र नंतर दोघेही एकमेकांचा हात धरून नाचू लागले. त्यांचा एकत्रित डान्स पाहून उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Director @SSRajamouli and his wife groove to the beats of Beautiful melody pic.twitter.com/ib5RjAQVxy
— Suresh PRO (@SureshPRO_) March 31, 2024
राजामौली व रमा ज्या गाण्यावर डान्स करत आहेत ते गाण ‘प्रेमीकुडु’मधील अंदामैना प्रेमरानी’ हे आहे. हे गाणं मूळ तमिळ भाषेमध्ये असून ‘कधालिक्कम पेनिन’चे तेलुगू व्हर्जन आहे. ‘प्रेमीकुडु’ हा चित्रपट दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच हे गाणे दिवंगत गायक एस. पी.सुब्रमण्यम, उदित नारायण व पल्लवी यांनी गायले आहे.
२००१ साली राजामौली व रमा हे लग्नबंधनात अडकले होते. रमा या कॉश्च्युम डिझायनर व स्टायलिस्ट आहेत. राजामौली यांच्या चित्रपटांमध्ये कॉश्च्युम डिझायनरचे काम पाहतात. रमा यांना तीन वेळा कॉश्च्युम डिझायनरचा नंदी अवॉर्ड मिळाला आहे. ‘मगधीरा’, ‘ईगा’, ‘बाहुबली : द बिगिनिंग’, ‘बाहुबली २ : द कन्क्लूजन’, व ‘RRR’ या चित्रपटातील पात्रांचे कपडे रमा यांनी डिझाईन केले आहेत.
सध्या राजामौली यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ते महेश बाबूबरोबर एक चित्रपट करत आहेत. महेश यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने राजामौली यांच्याबरोबर चित्रपट करत असल्याचे सांगितले होते.