रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या घरात अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र दारु प्यायचे अन्…”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा खुलासा, ‘ती’ अभिनेत्री जेवण, दारु वाटायची आणि…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 1, 2024 | 7:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ranjeet Bedi told about many big celebrities of Bollywood having parties in his house

"माझ्या घरात अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र दारु प्यायचे अन्...", सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा खुलासा, 'ती' अभिनेत्री जेवण, दारु वाटायची आणि...

एखाद्या चित्रपटासाठी नायक जितका महत्त्वाचा असतो, तितकाच खलनायकही महत्त्वाचा असतो. खलनायकाशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकतो याची कल्पना करणंही हे दिग्दर्शक निर्मात्यांसाठी अवघड असते. त्याचबरोबर खलनायकाशिवाय चित्रपट बघणे हे प्रेक्षकांनादेखील न पटणारे आहे. त्यामुळे चित्रपटातील मुख्य कलाकारांना जेवढं प्रेम मिळतं, तेवढ्याच शिव्या चित्रपटातील खलनायकाला मिळतात. पण तरीही खलनायक हा चित्रपटासाठी महत्त्वाचाच असतो.

बॉलिवूडमधील अशाच काही खलनायकांपैकी एक लोकपिय खलनायक म्हणजे रणजीत बेदी. ज्येष्ठ अभिनेते रणजीत बेदी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित खलनायक म्हणून ओळखले जातात. स्वत:च्या जोरावर यश मिळवणाऱ्या या अभिनेत्याने ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशातच त्यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

यावेळी रणजीत यांनी त्यांच्या घरात बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींची पार्टी होत असल्याचे म्हटले. त्याबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “पूर्वी सूर्यास्त होताच दारु पिणे ही एक फॅशन होती. माझे तेव्हाचे अनेक मित्र हे दारू पित असत. धर्मेंद्र, अमिताभ हे रम प्यायचे. संजीव कुमार, शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर, विनोद खन्ना, राजेश खन्ना हे रात्रीचे माझ्या घरी दारू प्यायला येत असत. माझे आई-वडील तेव्हा दिल्लीमध्ये राहायचे आणि घरी नोकर-चाकर, दारु हे सगळंच असायचं. तर ते सगळे माझ्या घरी जमायचे.”

आणखी वाचा – Video : अद्वैत-नेत्रामध्ये रोमान्स, अस्तिकाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर कोणाचा मृत्यू होणार?, प्रोमोने वाढवली उत्सुकता

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी कधी कधी शूटिंग संपवून घरी यायचो तर घरी सर्वांची मैफिल रंगलेली असयाची. तर तेव्हा रिना राय पराठे बनावट असायची. मौसमी मासे बनवत असायची. तर परवीन बॉबी सर्वांना दारु वाटत असायची. असं सगळं वातावरण माझ्या घरी असायचं. त्यामुळे मी एकेकाळी असा वेळ बघितला आहे, जिथे अमिताभपासून मिथुनपर्यंत तर फिरोज खानपासून जितेंद्रपर्यंतचे तेव्हाचे सगळे मोठे स्टार्स माझ्या घरी असायचे.”

आणखी वाचा – आलिशान घर, हॉलमध्येच कित्येक ट्रॉफी अन्…; इतकं मोठं व प्रशस्त आहे कार्तिकी गायकवाडचं घर, बेडरुमचीही दिसली झलक

दरम्यान, रणजीत यांनी पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारून सर्वांना इतके घाबरवले आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही त्यांची प्रतिमा अशीच बनली होती. मात्र, खऱ्या आयुष्यात रणजीत हे पूर्णपणे वेगळे आहेत. ते मांसाहारही करत नाहीत आणि दारूही पित नाहीत. याशिवाय त्यांचा स्वभावही खूप लाजाळू आहे.

Tags: bollywood actorBollywood entertainment newsRanjeet Bedi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Athiya shetti pregnancy

अथिया शेट्टी व के.एल. राहुल होणार आई-बाबा?, सुनिल शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर सत्य समोर, टीम म्हणाली, "माझं बोलणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.