बुधवार, ऑगस्ट 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कलाकारांनाही लागलं अनिकेत काय खाणार?चं वेड, अक्षराही विचारतेय अधिपती आज काय बनवू?, म्हणाला, “काहीही बनवा पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 1, 2024 | 5:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshara - Adhipati On Trending Reel

Video : कलाकारांनाही लागलं अनिकेत काय खाणार?चं वेड, अक्षराही विचारतेय अधिपती आज काय बनवू?, म्हणाला, "काहीही बनवा पण…"

सोशल मीडियावर ट्रेंडिंग रीलकडे सध्या प्रेक्षकवर्ग अधिक ओढला जाताना पाहायला मिळत आहे. एखाद ट्रेंडिंग गाणं असो वा एखादा विषय असो त्यावर अनेकजण रील व्हिडीओ बनवताना दिसतात. अशाच एका ट्रेंडिंग रीलची भुरळ मालिकेतील कलाकारांनाही पडली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला तर प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. (Akshara – Adhipati On Trending Reel)

अशातच अक्षरा व अधिपती यांनी देखील एका ट्रेंडिंग रीलला फॉलो करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आज काय बनवू’, ‘जेवायला काय बनवू’, ‘आज जेवायला काय हवं’, ‘आज कोणते कपडे घालणार’, हा ट्रेंड जोरात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकजण हा ट्रेंड फॉलो करताना दिसत असून या ट्रेंडला अक्षरा व अधिपती देखील फॉलो करताना दिसत आहेत. दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन या ट्रेंडिंग रीलचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : रस्त्यावरील लोकांना जेवण वाटत होती सारा अली खान, अचानक भडकली अन्…; राग अनावर होताच म्हणाली, “विनंती करुनही…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या ट्रेंडिंग रीलमध्ये असं पाहायला मिळतंय की, अक्षरा अधिपतीला विचारते, “अधिपती आज काय बनवू?”, यावर अधिपती म्हणतो, “एप्रिल फूल सोडून काहीही बनवा”. या व्हिडीओला ‘नको देवराया अंत आता पाहू’ हे बॅकग्राउंड सॉंग लावण्यात आलं आहे. तर या व्हिडिओला “अधिपती आज मार खाणार”, असे कॅप्शन दिले आहे. आज १ एप्रिल रोजी एप्रिल फुलनिमित्त अक्षरा-अधिपतीचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडला मुलगा होणार की मुलगी?, स्वतःच दिलं उत्तर, येणारं बाळ कोणत्या क्षेत्रात काम करणार तेही ठरवलं, म्हणाली, “बाळाकडून…”

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा व अधिपती या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम कराताना दिसत आहेत. सध्या अक्षरा पुन्हा एकदा सासरी परतली असून आता ती भुवनेश्वरीला धडा शिकवणार का? याकडे लक्ष लागून राहील आहे. तर भुवनेश्वरी आणि अक्षरा यांच्यातल्या मतभेदामुळे अधिपतीला काय काय सहन करावं लागणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: Akshara - Adhipati On Trending Reelentertainmenttrending reeltula shikvin changalch dhada
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
New Marathi Movie Dashami
Entertainment

अन्यायावर विजयाची गर्जना, ‘दशमी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

ऑगस्ट 10, 2026 | 3:14 pm
Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumours
Entertainment

“खोटी माहिती प्रसारित केल्यास…”, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अभिनेत्री संतापली; पोस्ट शेअर करत कडक कारवाईचा इशारा

ऑगस्ट 10, 2026 | 12:54 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi new promo out see the details

Video : अद्वैत-नेत्रामध्ये रोमान्स, अस्तिकाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर कोणाचा मृत्यू होणार?, प्रोमोने वाढवली उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.