रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रस्त्यावरील लोकांना जेवण वाटत होती सारा अली खान, अचानक भडकली अन्…; राग अनावर होताच म्हणाली, “विनंती करुनही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 1, 2024 | 2:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sara Ali Khan Angry On Paparazzi

Video : रस्त्यावरील लोकांना जेवण वाटत होती सारा अली खान, अचानक भडकली अन्...; राग अनावर होताच म्हणाली, "विनंती करुनही..."

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. विशेषतः ती फिरताना पापाराझींच्या कॅमेरामध्ये स्पॉट होताना दिसते. पापाराझींच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत सारा हे नाव आवर्जून घेतलं जातं. साराची खास गोष्ट सांगायची झाली तर ती कधीही कॅमेऱ्यापासून लपत नाही. बिनधास्त ती कॅमेराला फेस करत पापाराझींसह संवाद साधताना दिसते. पण यावेळी जेव्हा सारा कॅमेरासमोर आली तेव्हा पापाराझींना पाहून तिचा राग अनावर झाला आणि ती त्यांच्यावर चिडली. सारा पापाराझींवर रागवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Sara Ali Khan Angry On Paparazzi)

सारा अलीकडेच गरिबांना अन्न वाटप करण्यासाठी गेली होती. अन्न वाटप करताना काही पापाराझी आले आणि तिचा व्हिडीओ बनवू लागले, हे अभिनेत्रीला काही पटले नाही त्यामुळे ती पापाराझींवर रागावली. साराचा अन्नदान करतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रस्त्याच्या कडेला बसलेल्या गरिबांना अन्न वाटप करताना दिसत आहे. या व्हिडीओत ती पापाराझींना व्हिडीओ न बनवण्याची विनंती करत असल्याचेही दिसत आहे.

आणखी वाचा – “चित्रपट बघायला आले तर थिएटर बूक करेन कारण…”, ‘स्वातंत्र्य सावरकर’वरुन देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला, म्हणाले, “गरळ ओकतात…”

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

व्हिडिओमध्ये सारा रागाने असं बोलताना दिसत आहे की, “कृपया असे करु नका. मी तुम्हाला विनवणी करुन थकले आहे. पापाराझींना पाहून साराचा राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसला. अन्न वाटप केल्यानंतर पापाराझींना बोल लगावून ती रागाने तिच्या कारकडे जाताना दिसली. साराच्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “कृपया तिला प्रायव्हसी द्या”. साराच्या आत्यानेही कमेंट करत म्हटलं आहे की, “मी दर शनिवारी पापाराझींना न बोलावता असे करते. हे रेकॉर्ड करु नका. हेच ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे”.

आणखी वाचा – “अभिनेत्रींमध्ये भांडण, गॉसिप आणि…”, मराठी अभिनेत्रींबरोबर काम केल्यानंतर मानसी नाईकची पोलखोल, म्हणाली, “सिनिअर अभिनेत्रीही…”

साराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सारा अली खानचे एकामागोमाग एक दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये साराचे भरभरुन कौतुक झाले. साराचा पहिला ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर करिश्मा कपूर, विजय वर्मा, डिंपल कपाडिया आणि पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. त्यानंतर साराचा ‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील साराची भूमिका पूर्णपणे वेगळी होती. या चित्रपटासाठी साराचे खूप कौतुक झाले आहे.

Tags: entertainmentsara ali khansara ali khan angrySara Ali Khan Angry On Paparazzi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shiv Thakare seen distributing Ration Kit to the needy on the occassion of Ramadan

Video : रमजानमध्ये शिव ठाकरेने मुस्लिम बांधवांना दिलं अन्नधान्य, मराठमोळ्या अभिनेत्याचं सर्वत्र कौतुक, नेटकरी म्हणाले, "मराठी कलाकाराचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.