रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बऱ्याच दिवसांनी बायको-लेकासह पुण्याच्या घरी पोहोचला शशांक केतकर, आईने बनवली सालपापडी, म्हणाला, “तांदूळ भिजवून…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 28, 2024 | 5:28 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Shashank ketkar shared a special video of eating Salpapadi see the details

Video : बऱ्याच दिवसांनी बायको-लेकासह पुण्याच्या घरी पोहोचला शशांक केतकर, आईने बनवली सालपापडी, म्हणाला, "तांदूळ भिजवून..."

झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. या मालिकेतील ‘श्री’ या भूमिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्याच्या श्री या पात्राने त्याला सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. शशांकने मराठी रंगभूमीसह रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तसेच तो आता छोट्या पडद्यावरील मालिकांमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  

अभिनेता सोशल मीडियाद्वारे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो कायमच चर्चेत राहत असतो. अशातच त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता नुकताच त्याच्या गावी पुण्याला गेला होता. यावेळचे काही खास क्षण त्याने या व्हिडीओद्वारे सांगितली आहे. त्याचबरोबर त्याने या व्हिडीओमध्ये त्याच्या लहानपणीच्या आवडीच्या पदार्थाची आठवणही सांगितली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

आणखी वाचा – लेकीसह भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये राहायला जाणार ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन, आराध्याला बच्चन कुटुंबियांपासूनही दूर ठेवणार कारण…

शशांकने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “काल खूप महिन्यांनी पुण्याला घरी गेलो होतो. अगदी लहानपणापासून आवडीचा पदार्थ म्हणजे, सालपापडी. आईकडे किंवा आजीकडे कधी याची मागणी केली की, त्या नेहमी उन्हाळ्यात करेन असं म्हणायच्या आणि अखेर काल तो योग आला. मी, प्रियांका आणि ऋग्वेद येतोय म्हटल्यावर आईने ३ दिवस आधी तांदूळ भिजवले आणि आमच्यासाठी सालपापड्या केल्या”.

आणखी वाचा – आदिती राव हैदरीने सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर दुसऱ्यांदा थाटला संसार, पहिल्या घटस्फोटानंतर लग्नाचा निर्णय, विवाहाबाबत सत्य समोर

यापुढे शशांकने त्याच्या कुटुंबियांचा उल्लेख करत “आम्ही सगळ्यांनी मिळून अक्षरशः एका बैठकीत सगळं पीठ संपवल” असं म्हणत त्याने “तुम्हाला आवडते का सालपापडी? तुम्ही काय म्हणता? सालपापडी की फेण्या? की आणखी काही?” असा प्रश्नही चाहत्यांना विचारला आहेआणि त्याच्या या प्रश्नाला चाहत्यांनी उत्तरेदेखील दिली आहेत. दरम्यान, शशांकच्या या व्हिडीओखाली चाहत्यांनी “सातारामध्ये याला साळपापडी म्हणतात, आमच्याकडे याला सांडई म्हणतात, आम्ही तांदूळ पापडी म्हणतो, आम्हीसुद्धा याला सालपापडीच म्हणतो आणि मला सालपापडी खूप आवडतात” अशा अनेक कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.

Tags: marathi actormarathi entertainment newsshashank ketkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Nilesh Sable Daughter

'चला हवा येऊ द्या'नंतर कुटुंबियांबरोबर असं आयुष्य जगत आहे निलेश साबळे, लेकीचा पहिल्यांदाच दाखवला चेहरा, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.