शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझीही मदत न घेता काम मिळवलंस अन्…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या बहिणीची मराठी मालिकांमध्ये एन्ट्री, म्हणाला, “उतू नको मातू नको…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 21, 2024 | 1:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sanket Korlekar On Her Sister

"माझीही मदत न घेता काम मिळवलंस अन्...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या बहिणीची मराठी मालिकांमध्ये एन्ट्री, म्हणाला, "उतू नको मातू नको..."

मराठी सिनेसृष्टीत भावंडांच्या बऱ्याच जोड्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांची एक लाडकी भावंडांची जोडी म्हणजे अभिनेता संकेत कोर्लेकर आणि अभिनेत्री उमा कोर्लेकर. संकेतने याआधी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. छोट्या पडद्यावरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा’ या लोकप्रिय मालिकेतून संकेत प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. (Sanket Korlekar On Her Sister)

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘अजूनही बरसात आहे’ या सारख्या प्रसिद्ध मालिकेतही संकेत झळकला. आता संकेत पाठोपाठ त्याची बहीण उमानेही मालिकाविश्वात पदार्पण केले आहे. सोशल मीडियावरही संकेत व उमा यांची जोडी नेहमीच सक्रिय असते. संकेत व उमा यांची भावा बहिणीची जोडी लोकप्रिय आहे. ते दोघेही वेगवेगळ्या विषयावर मजेशीर रील करत असतात. अशातच आता संकेतच्या बहिणीने मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे.

आणखी वाचा – प्रीतम दिशाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यात होणार का यशस्वी?, ‘पारु’ मालिकेमध्ये पुढे काय घडणार?, प्रोमोला प्रेक्षकांची पसंती

View this post on Instagram

A post shared by Sanket Avinash Korlekar (@korlekarmania)

स्टार प्रवाहवरील ‘साधी माणसं’ या मालिकेत उमा एका छोट्याशा भूमिकेत पाहायला मिळाली. प्रोमोमध्ये अभिनेत्रीची झलक पाहायला मिळाली. यानिमित्ताने संकेतने त्याच्या बहिणीसाठी खास पोस्ट केली आहे. संकेतने उमासाठी खास पोस्ट लिहीत असे म्हटलं की, “उमा तू पहिल्यांदा टीव्हीवर दिसलीस आणि नेमकं मी तिथे तुला बघायला नाही आहे. पण आनंद याच गोष्टीचा आहे की, तुझ्या स्वप्नांना उशिरा का होईना पण सुरुवात झाली. स्वतःच्या जीवावर माझीही मदत न घेता ही लहानशी भूमिका मिळवलीस. तुझा उत्तम अभिनय लवकरच योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि तुला अजुन छान भूमिका मिळेल. ज्यातून तुला तुझं खरी ताकद लोकांना दाखवता येईल”.

आणखी वाचा – “मी माफी मागणार नाही…”, मंदिर-मशिदीत जाण्यावरुन सारा अली खान ट्रोल, अखेर अभिनेत्रीचे हिंदू-मुस्लिमांबाबत मोठं भाष्य

पुढे तो म्हणाला, “आज चित्रपटसृष्टीत माझं १२ वे वर्ष सुरु आहे. या हक्काने तुला सांगेन की उतू नको मातू नको हातातलं काम अर्ध्यात सोडू नको. खूप शुभेच्छा. माझी मैत्रीण मानसीला खूप प्रेम, कारण १० दिवस तिने उमाची खूप काळजी घेतली. त्यात माझा मित्र आकाश नलावडेचे देखील कौतुक की, सेटवर त्याने उमाची पुरेपूर काळजी घेतली. खूप खूप प्रेम”, असं म्हणत त्याने बहिणीचं कौतुक केलं. संकेतच्या या पोस्टवर अनेकांनी त्याच्या बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: marathi actressmarathi serialsadhi manassanket korlekar and uma korlekarSanket Korlekar On Her Sister
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kangana Ranaut On Sadhguru Health

अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांची प्रकृती बिघडल्यानंतर सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला काही सुधरेना, म्हणाली, "सूर्यच उगवणार नाही जर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.