‘झी मराठी’ वाहिनी गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या वाहिनीने आजवर प्रेक्षकांची मन जपत त्यांचं मनोरंजन करण्यात कोणतीही कमतरता भासू दिली नाही आहे. वेगवेगळे कथानक घेऊन येत ही वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच सज्ज असलेली पाहायला मिळते. अशातच ही वाहिनी सध्या रसिक प्रेक्षकांसाठी विविध कथानक घेऊन आली असून नवनवीन मालिका घेऊन आली आहे. ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका सध्या रसिक प्रेक्षकांसाठी ‘झी मराठी’ वाहिनी घेऊन आली आहे. (Zee Marathi Serial Promo)
या मालिकांना अल्पावधीतच उत्तम प्रतिसादही मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकांपैकी ‘पारू’ या मालिकेला भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. साताऱ्यात सुरु असणाऱ्या या मालिकेचं सगळेचजण कौतुक करत आहेत. सुरुवातीला या मालिकेला काहींनी ट्रोल केलं मात्र त्यानंतर मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांची मन जिंकली. सध्या ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली असून मालिकेत दाखवण्यात आलेली सकारात्मकता सगळ्यांच्या पसंतीस पडत आहे.
‘पारू’ या मालिकेत प्रीतम हा तिच्या होणाऱ्या पत्नीचा म्हणजेच दिशाचा पर्दाफाश करणार आहे. बाहेर असलेल्या अफेअरच सत्य तो अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्यासमोर आणणार आहे, असा प्रोमो झी मराठी वाहिनीने शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांना अतिशय आनंद झाला असून मालिकेत चांगलं घडताना दाखवल्याने अनेकांनी कौतुक केलं आहे. तर नव्या मालिका येताच जुन्या मालिकांचे प्रोमो टाकणं कमी केल्याने नेटकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
तर काहींनी हा प्रोमो पाहून “हे प्रीतमने पाहिलेलं स्वप्न असेल का?”, “असा प्रोमो दाखवून इतक्या लवकर सत्य समोर येणार नाही, दिशाभूल आहे”, असंही म्हटलं आहे. आता नेमकं मालिकेत काय होणार?, प्रीतम दिशाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का? हे पाहणं साऱ्यांना रंजक ठरणार आहे.