शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

समीर वानखेडेंचा राखी सावंतविरोधात मानहानीचा दावा, अभिनेत्रीच्या ‘त्या’ विधानानंतर प्रकरण वाढलं, म्हणालेली, “गिधाड बनून मुलांवर हल्ला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 20, 2024 | 4:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rakhi sawant vs sameer wankhede

समीर वानखेडेंचा राखी सावंतविरोधात मानहानीचा दावा, अभिनेत्रीच्या 'त्या' विधानानंतर प्रकरण वाढलं, म्हणालेली, "गिधाड बनून मुलांवर हल्ला…"

बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या अतरंगी वागण्यामुळे सतत चर्चेत असते. बेधडक वक्तव्य, अतरंगी पोशाख यामुळे राखीची सोशल मीडियावर अधिक चलती आहे. नुकतेच तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुरानीने दुसरं लग्न केल्याने त्याच्या गंभीर आरोप करताना राखी दिसली. पण आता ती तिच्या पतीमुळे किंवा तिच्या विचित्र वागण्यामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. राखीने माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडली आहे. (rakhi sawant vs sameer wankhede )

‘बिग बॉस १४’ मुळे अधिक चर्चेत आलेली राखी व तिचे वकील अली काशिफ खान यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. हा दावा माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केला असून त्यामध्ये ११ लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. पण हा मानहानीचा दावा नक्की का करण्यात आला हे जाणून घेऊया.  

आणखी वाचा – व्हेंटिलेटरवर आहे दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती, भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज, कुटुंबियही मागत आहेत पैशांची मदत, कलाकारांचीही मदत नाही अन्…

View this post on Instagram

A post shared by Photo Raaj ???? (@photoraaj)

समीर यांनी आपली तक्रार दाखल करत राखी व अली काशिफ खान यांच्याविरोधात त्यांची प्रतिमा खराब करुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. पण समीर यांच्या याचिकेवर राखीच्या वकिलांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, “कायद्यानुसार जेव्हा जनतेच्या भल्यासाठी काही खरं बोललं जातं तेव्हा ती मानहानी ठरू शकत नाही. आयपीसी कलम ४९९ अंतर्गत ‘पब्लिक कंडक्ट ऑफ पब्लिक सर्व्हंट’ हा अपवाद आहे म्हणजे यामध्ये एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या सार्वजनिक कामातील त्यांच्या वागण्याबद्दल किंवा त्याच्या प्रतिमेबद्दल एखादे मत सांगितले तर त्याला मानहानी म्हणता येत नाही”.

आणखी वाचा – नितेश तिवारींच्या ‘रामायण’मध्ये ‘हा’ सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार लक्ष्मणची भूमिका, तर रणबीर कपूर मोठ्या पडद्यावर साकारणार राम

पुढे ते म्हणाले की, “याचे योग्य ते उत्तर दिले जाईल. जर समीर यांनी त्यांचे बोलणे खरं करुन दाखवलं तर मी त्यांना ११.०१ लाख रुपये देईन”. यावर अद्याप राखीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान हे प्रकरण अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान संबंधित आहे. आर्यनला एनसीबीने ड्रग्स केसमध्ये अटक केली होती त्यावेळी राखीने आर्यनच्या बाजूने अनेक व्हिडीओ सोशाल मीडियावर शेअर केले होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये तिने म्हंटले होते की, “जर तुम्ही सिंह असाल तर सिंहाबरोबर लढा. गिधाड बनून मुलांवर हल्ले करु नका”, तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान या प्रकरणाचा निकाल काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Tags: actioncourt casedefemation caserakhi sawantSameer Wankhede
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte Serial Troll

"आशुतोषपेक्षा अनिरुद्धला मारायचं होतं", 'आई कुठे…'मधील अरुंधतीच्या नव्या प्रवासावरुन प्रेक्षक भडकले, म्हणाले, "किती नवरे बदलणार?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.