बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा व भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे सध्या त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या येण्याने अधिक चर्चेत आहेत. त्यांना आधी एक वामिका नावाची मुलगी आहे. तसेच १५ फेब्रुवारीला अनुष्काने लंडन येथे मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अकाय असे ठेवण्यात आले. मुलाच्या येण्याची बातमी अनुष्का व विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. चिमुकल्याचे आगमन झाल्याने सगळ्यांनीच कोहली कुटुंबाचे अभिनंदन केले होते. पण अकायच्या जन्मानंतर अनुष्का व विराट हे भारतात दिसले नाहीत. ते आता आपल्या दोन्ही मुलांबरोबर लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. (virat kohli and anushka sharma)
नुकताच विराट भारतामध्ये दिसून आला. पण त्याच्याबरोबर अनुष्का व मुलं दिसली नाहीत. अनुष्का गेल्या पाच महिन्यांपासून लंडनमध्येच आहे. तसेच आता ती विराट बरोबरही आली नसल्याने ती आता कायमची लंडनमध्येच राहणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.
अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच विराट भारतात आला. २२ मार्च २०२४ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु व चेन्नई सुपर किंग्स या मॅचमध्ये तो खेळताना दिसणार आहे. तो भारतात एअरपोर्ट दिसला तेव्हा “अनुष्का कुठे आहे?” असे त्याला विचारण्यात आले. मात्र त्याने त्यावर कोणतेही उत्तर दिले नाही.
त्यामुळे त्यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एक नेटकरी म्हणाला की, “विराट केवळ आयपीएल खेळण्यासाठी भारतात आला आहे. पण क्रिकेट झाल्यानंतर मात्र सर्वजण लंडनला स्थायिक होतील”. दुसरा नेटकरी म्हणाला की, “तुमच्याकडे पैसे असतील तर लंडनमध्ये तुम्ही आरामात जगू शकता”. तसेच काही जणांनी नाराजगी देखील दर्शवत म्हणाले की, “आधी एकाने पत्नीसाठी देश सोडला, आता हा फ्रेंचायजीसाठी पत्नीला सोडून आला”.
विराट व अनुष्का यांची लंडनमध्ये मालमत्ता आहे. अकायचा जन्म तिथे झाल्यानंतर त्याला तेथील नागरिकता मिळेल. पण तेथील नियमानुसार नागरिकता मिळवण्यासाठी आधी आई-वडील तेथील नागरिक असणे गरजेचे असते. त्यामुळे अनुष्काने आपले करिअर खरचं सोडलं आहे का ? हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.



