शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या आदराचा गैरवापर…”, रणवीर शौरीचे महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाला, “पूजाला डेट करत होतो तेव्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 19, 2024 | 10:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ranveer shorey on Mahesh bhatt

“माझ्या आदराचा गैरवापर...”, रणवीर शौरीचे महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाला, “पूजाला डेट करत होतो तेव्हा...”

बॉलिवूड क्षेत्रांमध्ये प्रत्येक दिवसाला काही ना काही घडत असतं. अनेक कलाकार वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. त्यातील एक अभिनेता म्हणजे रणवीर शौरी. रणवीरने २००२ साली ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो ‘जिस्म’, ‘लक्ष्य’ या चित्रपटांमध्येही दिसला. २००७साली त्याने अभिनेत्री कोंकणा सेन शर्माला डेट करण्यास सुरुवात केली आणि दोघेही २०१० साली लग्नबंधनात अडकले. दोघांनाही हरुन नावाचा एक मुलगाही आहे. पण आता तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. (Ranveer shorey on Mahesh bhatt)

आपल्या कसदार अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रणवीरने चित्रपट निर्माते व दिग्दर्शिक महेश भट्ट यांच्या आरोप कले आहेत. तसेच त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दलही भाष्य केले आहे. त्याचे म्हणणे आहे की बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी होत असून पडद्यामागे सर्वजण या गोष्टीचा स्वीकारही करतील. महेश यांच्याबद्दल रणवीरच्या मनात खूप आदर होता. मात्र त्यांचा वापर करण्यात आला असं रणवीरने सांगितलं आहे. रणवीर एकेकाळी महेश भट्ट यांची मुलगी अभिनेत्री पूजा भट्टला डेट करत होता. मात्र त्याच वेळी तिलाही खूप मॅन्यूपलेट केले गेले. याबद्दल रणवीरने ‘ANI’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

आणखी वाचा – नवरा-बायकोची जबरदस्त जुगलबंदी रंगणार, रोहित-जुईलीच्या आवाजातील ‘तू माझी पुरणपोळी रे’ गाणं लवकरच येणार

View this post on Instagram

A post shared by Ranvir Shorey (@ranvirshorey)

रणवीरने सांगितले की, “मी महेश भट्ट यांचा खूप आदर करायचो. पण मी जेव्हा पूजाला डेट करण्यास सुरू केले तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनात जो आदर होता त्याचा ते गैरवापर करु लागले. माझ्याबरोबर खूप विचित्र वागणं सुरू झालं होतं.”

आणखी वाचा – ‘या’ हिंदू अभिनेत्रीने लग्नानंतर बदलला धर्म, रमजानमध्ये उपवास करण्यावरुन ट्रोल, नेटकरी म्हणाले, “नवरात्रीतही…”

त्यानंतर तो बॉलिवूडमधील गटबाजीवरही भाष्य केले.१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी मिळाला. त्याच्या मृत्यूनंतर काम व गटबाजीबद्दल खूप चर्चा होऊ लागली. काही काळानंतर सुशांतबद्दलही असंच वागणं सुरू झालं. त्यावर रणवीर म्हणाला की, “हे या क्षेत्रामध्ये नेहमीच चालतं. एखाद्याच्या विरोधात गट बनवणं, बाजूला करणं, कोणाच्या तरी सहाय्याने वर जाणं तसेच एखाद्याचे करिअरदेखील धोक्यात घालणे हे सर्व होत असतं. हे राजकारण सर्वच ठिकाणी होतं. पण हे योग्य नाही.”

सुशांत व त्याच्या मैत्रीबद्दलही रणवीरने सांगितले. तो म्हणाला की, “आम्ही ‘सोनचिडिया’ चित्रपटामध्ये एकत्रित काम करत होतो. आम्ही व्यवयामाच्या आवडीने अधिक घनिष्ट मित्र झालो. तो माझा खूप चांगला मित्र होता”.

रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो ‘टायगर ३’ मध्ये सलमान खान बरोबर दिसून आला होता. त्याच्या आभूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते.     

Tags: actor ranveer shoreybollywood actorMahesh bhattRanveer shorey
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Badshah Honey Singh Controversy

बादशाहच्या कॉन्सर्टमध्ये हनी सिंगच्या चाहत्यांचा गोंधळ, 'ते' दृश्य पाहून गायक भडकला, म्हणाला,"पापा का कमबॅक..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.