मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवरा-बायकोची जबरदस्त जुगलबंदी रंगणार, रोहित-जुईलीच्या आवाजातील ‘तू माझी पुरणपोळी रे’ गाणं लवकरच येणार

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 19, 2024 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rohit Raut and Juilee Joglekar will come soon with a Holi special song tu majhi puranpoli re

नवरा-बायकोची जबरदस्त जुगलबंदी रंगणार, रोहित-जुईलीच्या आवाजातील 'तू माझी पुरणपोळी रे' गाणं लवकरच येणार

मराठी संगीत विश्वातील सध्याच्या काही आघाडीच्या गायक जोडींपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे गायक रोहित राऊत व गायिका जुईली जोगळेकर. ‘सारेगमप’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून लोकप्रियता मिळवत त्याने मराठीसह हिंदी रसिक श्रोत्यांनाही मंत्रमुग्ध केले आहे. जुईली जोगळेकर व रोहित राऊत यांनी याआधी काही संगीत स्पर्धांमधून तसंच गाण्यांच्या कार्यक्रमांमधून एकत्र गाणी गायली आहेत. महाराष्ट्रभरात अनेक म्युझिक कॉन्सर्ट्समधून रोहित-जुईलीने रसिक श्रोत्यांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले आहे.

जुईली व रोहित गायनाचे विविध कार्यक्रम घेत नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. दोघांनीही त्यांच्या गोड आवाजाने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. शिवाय दोघेही सोशल मीडियावरुनही अनेकदा एकत्र गाणी गाताना दिसतात. रोहित व जुईली यांची अनोखी केमिस्ट्री कायमच प्रेक्षकांना भावते. दोघे सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. आपले अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

आणखी वाचा – चार वर्षांनी नवऱ्यासह भारतात परतली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाशिकमध्ये स्वतःच्या गावीही गेली, आता दिसते अशी, म्हणाली, “माझं नाशिक…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

अशातच काही दिवसांपूर्वी रोहित-जुईलीने त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक खास पोस्ट शेअर करत त्यांच्या आगामी नवीन गाण्याबद्दल पोस्ट शेअर केली होती. दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या आगामी गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यानचे खास फोटो पोस्ट केले होते. तेव्हापासून त्यांच्या अनेक चाहत्यांना या नवीन गाण्याविषयी उत्सुकता लागली होती. अशातच आता ही उत्सुकता संपली आहे. रोहित व जुईली लवकरच एक होळीनिमित्त खास गाणं घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात, तासभर रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होती अन्…; मृत्यूशी सुरु आहे झुंज, बहिणीने दिली माहिती

मीडिया वन सोल्यूशन्स प्रस्तुत आणि इट्स मज्जा ओरिजिनल हे होळीनिमित्त प्रेक्षकांसाठी खास गाणं घेऊन येणार आहेत. या होळी स्पेशल गाण्याचे नाव ‘तू माझी पुरणपोळी रे’ असं असून हे खास गाणं रोहित व जुईली यांनी गायलं आहे. लवकरच हे गाणं रसिक श्रोत्यांच्या भेटीला येणार असून या गाण्याविषयी चाहत्यांमध्येही चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Tags: Juilee Joglekarrohit rautTu Majhi Puranpoli Re
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Maharashtrachi Hasyajatra

अखेर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमला प्रसाद ओकने दिली पार्टी, नवीन घरात केला पाहुणचार, म्हणाला, "रसिकांनी या घटनेची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.