शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर परदेशात रमली पूजा सावंत, नवऱ्याबरोबर घेत आहे सुट्ट्यांचा आनंद, सोशल मीडियावर शेअर केलेल्या रोमॅंटिक फोटोंची चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 17, 2024 | 6:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pooja Sawant shared romantic photos with husband Siddesh Chavan on social media

लग्नानंतर परदेशात रमली पूजा सावंत, नवऱ्याबरोबर घेत आहे सुट्ट्यांचा आनंद, सोशल मीडियावर शेअर केलेल्या रोमॅंटिक फोटोंची चर्चा

मराठी मनोरंजन सृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, निरागस हास्याने व मनमोहक सौंदर्याने पूजाने अनेकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा ही तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली आहे.

पूजा व सिद्धेशच्या शाही विवाहसोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजा व सिद्धेशने बॉलिवूड स्टाईलने लग्नसोहळा उरकत साऱ्यांच्या नजर वळविल्या. मात्र दोघांनी मराठमोळी परंपराही यावेळी जपली. पूजा व सिद्धेश याच्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींचे फोटोही चर्चेत राहिले. हळदी, संगीत सोहळ्यांमधील त्यांची धमाल, मस्तीही पाहायला मिळाली. लग्नानंतर पूजा आपल्या संसारात चांगलीच रमलेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत सिद्धार्थ-तितीक्षा, बायकोने नवऱ्यासाठी केला खास बेत, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…

लग्नानंतर पूजा व सिद्धेश ही जोडी ऑस्ट्रेलियाला गेली असून दोघेही लग्नानंतच्या खास क्षणांचा आनंद घेत आहेत. पूजा व सिद्धेश दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे त्यांनी आपल्या लग्नाचे खास फोटो शेअर केले होते. अशातच त्यांच्याअ नवीन फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी सिद्धेशबरोबरचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजाचा बोल्ड लुकही पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम एल्विश यादवला अटक, पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांची कारवाई

दरम्यान, पूजा व सिद्धेशच्या हळदी, संगीत व लग्न समारंभाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अशातच त्यांच्या या फोटोंनीही साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच त्यांनी शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनीदेखील लाईक्स् व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी त्यांच्या या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.  

Tags: marathi entertainment newspooja sawantsiddesh chavan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Next Post
Today 18 march 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशीभविष्य : ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस असणार खास, तर ‘या’ राशीच्या लोकांची होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.