शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सासूबाईंचं नाव घेताच घाम फुटतो कारण…”, प्रसाद जवादेला सासरच्या मंडळींकडून कशी मिळते वागणूक?, म्हणाला, “वेळ-काळ समजून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 13, 2024 | 3:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prasad Jawade On Her Mother In Law

"सासूबाईंचं नाव घेताच घाम फुटतो कारण...", प्रसाद जवादेला सासरच्या मंडळींकडून कशी मिळते वागणूक?, म्हणाला, "वेळ-काळ समजून..."

अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ‘बिग बॉस’ मराठीमुळे ही जोडी चर्चेत आली. ‘बिग बॉस’मध्ये असताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनतर या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. प्रसाद व अमृता यांनी थेट त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर अगदी शाही थाटामाटात या जोडीचा विवाहसोहळा संपन्न झाला. अमृता व प्रसादच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Prasad Jawade On Her Mother In Law)

अमृता-प्रसादच्या लग्नाला त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी, कुटुंबीयांनी व कलाकार मित्रांनी धमाल-मस्ती केलेली पहायला मिळाली. लग्नानंतर लगेचच ही जोडी त्यांच्या सुखी संसारात रमलेली दिसली. शिवाय दोघांनीही त्यांच्या कामालाही सुरुवात केली आहे. अमृता सध्या नाटकविश्वात रमलेली दिसत आहे तर प्रसाद त्यांच्या नव्या ‘पारू’ या मालिकेच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर प्रसाद जवादेने हजेरी लावली होती. यावेळी त्याने ‘इट्स मज्जा’सह अनेक गप्पा मारल्या.

आणखी वाचा – Video : गवताचं पातं Is Back, ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवरच गाणं म्हणत नाचू लागले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार, समीर चौघुले बघतच बसले अन्…

प्रसादने त्याच्या व सासूबाईंच्या नात्याबद्दल भाष्य केलं. प्रसाद म्हणाला, “सासूबाईंचं नाव घेतलं की मला घाम फुटतो. माझ्या सासूबाई खूप गोड आहेत. खरं सांगायचं तर मला अजून एक आई भेटली असं मला वाटतं. त्या मला खूप सांभाळून घेतात, नवनवीन गोष्टीही त्या सांगत असतात. बरेचदा कामानिमित्त मला अमृताला सांभाळता येत नाही तेव्हा त्या तिच्याबरोबर असतात. अजूनतरी मी सासुरवास भोगला नाही आणि मला भोगावा लागेल असंही वाटत नाही. कारण सगळेच या क्षेत्राशी निगडित आहेत, त्यामुळे या क्षेत्रातील असल्यामुळे सगळेचजण वेळ-काळ समजून घेतात”.

आणखी वाचा – बायकोपासून दूर राहावं लागत असल्याचं प्रसाद जवादेला दुःख, साताऱ्यामध्ये करत आहे शूट, म्हणाला, “बायकोला सोडून…”

एकूणच प्रसादच्या या म्हणण्यावरुन त्याच व त्याच्या सासूमध्ये खास बॉण्डिंग असल्याचं समजत आहे. शिवाय अमृताबद्दल बोलतानाही प्रसादने यावेळी भाष्य केलं. शुटिंगनिमित्त साताऱ्यात असल्याने तो घराला, बायकोला मिस करत असल्याचंही त्याने यावेळी बोलताना सांगितलं.

Tags: amruta deshmukh motherentertainmentmarathi actorprasad jawadePrasad Jawade On Her Mother In Law
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Adesh Bandekar served food to the guests

Video : आदेश बांदेकर यांच्या 'या' कृतीचं होतंय कौतुक, पाहुण्यांना स्वतःच जेवण वाढलं अन्…; जपली मराठी संस्कृती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.