शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : यालाच म्हणतात संस्कार! गावी जाऊन भजनी मंडळींमध्ये रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, अंगणात बसून भजन गातानाचा व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 13, 2024 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Dil Dosti Duniyadari fame Amey Wagh shared a video of singing bhajan on social media

Video : यालाच म्हणतात संस्कार! गावी जाऊन भजनी मंडळींमध्ये रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, अंगणात बसून भजन गातानाचा व्हिडीओ व्हायरल

मराठी नाटक, मालिका, चित्रपट व ओटीटी माध्यमाद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. अमेय वाघने त्याच्या सशक्त अभिनयानं आणि प्रभावी सादरीकरणानं मराठीसह इतर भाषिक मनोरंजनसृष्टीतही आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अमेय वाघ सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.

अमेयच्या या फोटो व व्हिडीओवर चाहतेही भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच अमेयने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो भजनात दंग झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच महाशिवरात्रीचा सण साजरा झाला. अवघ्या देशभरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तीमय वातावरण होते. याच शिवरात्रीनिमित्त अमेयने त्याच्या गावी भेट दिली होती. यावेळी त्याने पालखी सोहळ्यातदेखील सहभाग घेतला होता.

View this post on Instagram

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

आणखी वाचा – बायकोला पुरस्कार मिळताच नाचू लागला प्रसाद जवादे, पुरस्कार मिळाल्यानिमित्त अमृताला देणार ‘हे’ खास गिफ्ट, म्हणाला…

अमेयने स्वत:च्या खांद्यावर पालखी घेतल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. अशातच त्याचा हा भजनामध्ये दंग झाल्याचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. “पूरे झाली शहरातल्या मित्रांबरोबर चंगळ. मला सामावून घेत आहे गावातलं भजनी मंडळ” असं म्हणत अमेयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमेय ‘हे भोळ्या शंकरा’ हे पारंपरिक भजन गात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी त्याने टाळ वाजवत या भजनावर चांगलाच ठेका धरला असल्याचेही पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “प्रोमो पाहून प्रेक्षक हलले”, मालिकेतील नव्या ट्विस्टबाबत ‘आई कुठे…’ फेम अरुंधतीने केलं भाष्य, म्हणाली, ” मी स्वतः…”

दरम्यान अमेयने शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “किती छान, मस्तचं, खूपच भारी, हल्ली याची खूपच गरज आहे” अशा अनेक कमेंट्स करत अमेयचे कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी त्यांना हे भजन आवडले असल्याचेदेखील म्हटले आहे.       

Tags: Amey WaghAmey Wagh Singing BhajanDil Dosti Duniyadari fameentertainment newsmarathi actormarathi entertainment newsMarathi newsअमेय वाघअमेय वाघ भजन गात आहेदिल दोस्ती दुनियादारी फेममनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Arijit Singh
Entertainment

मनाचा मोठेपणा! अरिजित सिंगच्या हॉटेलमध्ये सर्वसामांन्यांना इतक्या रुपयांत पोटभर जेवण, गायकाच्या निर्णयाचं कौतुक

मे 10, 2025 | 12:41 pm
akshay kelkar wedding
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

मे 10, 2025 | 11:26 am
Pawandeep Rajan  Health
Entertainment

अपघातानंतर पवनदीपवर पुन्हा शस्त्रक्रिया, आठ तास सुरु होतं ऑपरेशन, आता परिस्थिती अशी की…

मे 10, 2025 | 10:48 am
Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Next Post
Namrata Sambherao Video

Video : गवताचं पातं Is Back, ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवरच गाणं म्हणत नाचू लागले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार, समीर चौघुले बघतच बसले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.