अभिनेता संजय दत्त हा नेहमी अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. त्याचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक याबद्दल नेहमी चर्चा होत असतात. संजय नुकताच ‘लिओ’ या चित्रपटात दिसला होता. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर त्याचे वैवाहिक आयुष्यही अधिक चर्चेत राहिले आहे. २००८ मध्ये तो मान्यताबरोबर विवाहबंधनात अडकला. पण मान्यता ही त्याची दुसरी पत्नी आहे. त्याआधी त्याचे ऋचा शर्माबरोबर लग्न झाले होते. दोघांनाही त्रिशला नावाची मुलगीही आहे. त्रिशला पाच वर्षाची असताना तिची आई ऋचाचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला. तेव्हापासून ती आजी-आजोबांबरोबर राहू लागली. पण नुकतीच तिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे ज्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (trishala dutt on sanjay dutt)
पहिल्या पत्नीपासून संजयला एक मुलगी आहे तर दुसरी पत्नी मान्यतापासून २ मुलं आहेत.तो सध्या मान्यता व दोन मुलांबरोबर राहतो. अशातच त्रिशलाने आई बाबा नसण्याचे फायदे सांगितले आहेत. तिची ही पोस्ट पाहताच नेटकाऱ्यांनी संजय दत्तवर प्रचंड नाराजी दर्शवली आहे. त्रिशलाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “कधी कधी आई-वडील नसणं हे फायद्याचं असतं. त्यांच्याबरोबर असणं ही दु:खदायक ठरू शकतं. याचे कारण म्हणजे त्यांच्याबरोबर असणारे वाईट अनुभव हे त्यांच्या नसण्यापेक्षा अधिक दु:ख देतात. ही वेदना त्यांच्याबरोबर असण्यापेक्षाही वाईट आहे. हे बरोबर वाटत नाही. पण तुम्ही ठीक व्हाल”.

त्रिशलाच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी संजय दत्तवर नाराजी दर्शवली आहे. या पोस्टवर नेटकाऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. नेटकरी लिहितात की, “संजय दत्त हा आयुष्यभर बेजबदार वागला त्याचे परिणाम आता त्याच्या मुलीला भोगावे लागत आहेत”, दुसरा नेटकरी लिहितो की, “त्रिशलाचे आयुष्य दुर्दैवी आहे”, तसेच काही नेटकरी लिहितात की, “संजयने आपल्या मुलीबरोबरही वेळ घालवावा”.
एकदा मुलाखतीमध्येही त्रिशलाला संजय दत्तबद्दल विचारण्यात आले होते. तिला विचारलं होतं की, “तुला संजय दत्तची मुलगी आहेस ते कसं वाटत?”, त्यावर ती म्हणाली की, “काही नाही एकदम नॉर्मल वाटत. जसे सर्वांचे वडील असतात तसेच ते माझे वडील आहेत. जेव्हा मी त्यांच्याबरोबर असते तेव्हा मी माझं सर्वात चांगला वेळ घालवत असते. असं काही वेगळं वाटत नाही”.
पण त्रिशलाच्या या पोस्टवरुन मात्र तिला नक्की काय म्हणायचं आहे? याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.