रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ही बॉलीवूड मधील जगप्रसिद्ध जोडी म्हणून ओळखली जाते.तर संपूर्ण महाराष्ट्रचे ते लाडके दादा वाहिनी आहेत. महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा “वेड” या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडलेली दिसते. या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलेला. जेनेलियाचा वेड हा पहिला मराठी सिनेमा असून यात रितेश आणि जेनेलियाची केमेस्ट्री चांगलीच जुळून आलेली पाहायला मिळतेय. (Ritesh Geneliya video viral)
====
हे देखील वाचा –‘मला माहिती आहे खरं प्रेम काय असत’ प्रेमाबद्दल खुलास्याचा प्राजक्ताचा व्हिडिओ व्हायरल
====
या आधी जेनेलिया रितेश सोबत माउली या मराठी सिनेमा मध्ये एका गाण्यावर थिरकली आहे.रितेश देशमुख आणि जेनेलिया ही महाराष्ट्राची लाडकी जोडी सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असते. या लाडक्या दादा वाहिनीचा झी चित्र गौरव सोहळ्यातील एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत ठरतोय. झी चित्रगौरव २०२३ च्या मंचावर पुरस्कार स्वीकारल्या नंतर रितेश, जेनेलिया, श्रेयस तळपदे यांच्या रंगलेल्या चर्चानी एकच हशा पिकवला. श्रेयस तळपदे ने रितेशला सुखी संसाराचं काय रहस्य आहे असा प्रश्न विचारला तेव्हा उत्तरादखल रितेशने ‘माणसाने आपली चूक कबूल करावी’ असं म्हणत तो जिनिलियाच्या पाय पडलाआणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच हसू खुलवल.

रितेश जिनिलियाची ही जोडी त्याच्या कॉलेज काळापासून चांगलीच चर्चेत आहे. बॉलीवूड मध्ये प्रचंड यश मिळवल्या नंतर आणि मराठी मध्ये लय भारी चित्रपटानंतर ही जोडी प्रेक्षकांसाठी ‘वेड’ हा धमाकेदार चित्रपट घेऊन आली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगलीच कामे करत अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर केले. वेड या चित्रपटातून रितेश ने दिगदर्शक म्हणून पदार्पण केले आणि पहिल्याच पदार्पणात त्याच्या चित्रपटाने इतिहास रचला. वेड हा चित्रपट हिट ठरल्यानंतर रितेश देशमुख दिगदर्शित कोणता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.(Ritesh Geneliya video viral)