अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. तिने मालिका, चित्रपट, वेबसीरिज यात तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकल. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या सर्वच फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.(Prajakta Mali on love)
फोटो आणि अभिनया सोबतच प्राजक्ता चर्चेत असते ते म्हणजे विविध वक्तव्यांसाठी, मतांसाठी. नुकताच झी युवा सन्मान येथे प्राजक्ताला प्रेम आणि करिअर यांच्या मध्ये तुला महत्वाचं काय आहे? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला तेव्हा प्राजक्ताने दिलेलं उत्तर चांगलंच व्हायरल होताना दिसतंय. प्रेम हे जगातील खूप मोठी गोष्ट आहे. मोठ्यातल्या मोठ्या संकटाना समोर जाण्याची ताकद प्रेमामध्ये असते. करिअर आणि प्रेम यातून एकाची निवड करणं खूप अवघड गोष्ट आहे. प्राजक्ताच्या मतानुसार आताच्या घडीला असणार प्रेम हे आर्थिक परिस्थती पाहून,रडण्यासाठी लागणार खांदा म्हणून किंवा समाजाला दाखवायला केलं जात. पुढे ती म्हणाली की प्रेमाची ताकद मला माहिती आहे, खरं प्रेम काय असत हे देखील मला माहिती आहे.

हे करिअर बद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाली माझ्यासाठी काम म्हणजे माझी जीवन पद्धती आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि कला हे माझ्यासाठी मूलभूत गरजा आहेत आणि हीच माझ्या करीअरची व्याख्या आहे. त्यामुळे प्रेम आणि करिअर या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत.(Prajakta Mali on love)
=====
हे देखील वाचा – बजरंग दलाचा MC स्टॅन वर हल्ला!चाहत्यांकडून कारवाईची मागणी
=====
प्राजक्ताच्या या विचारावर अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करून प्राजक्ताचं कौतुक केलं आहे. तर प्राजक्ताच्या या विधानावर चाहत्यांनी भावी वाटचालीस तुला खूप शुभेच्छा, तुला हवा तसा वर मिळो, अशा अनेक कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर करिअर आणि प्रेम महत्वाचं का असत हा सल्ला देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडलेला दिसतोय.