निवेदिता सराफ आणि अशोक सराफ ही जोडी म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी. पडद्यावर नाही तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांना जगण्याची दिलेली उमेद याचं हुबेहूब उदाहरण म्हणजे अशोक आणि निवेदिता यांची जोडी. आयुष्यात घडलेले बरेच प्रसंग वा आलेले अडथळे दोघांनी पेलवत त्यातून मार्ग काढला. आजही त्यांचे बरेच असे ऐकण्याजोगे किस्से आहेत जे ऐकून थक्क व्हायला होतं. अशोक मामांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात एक किस्सा सांगितला. मात्र हा किस्सा वाचून हसू आवरलं नाही. (nivedita saraf ashok saraf)
चित्रपटांच्या यादीत असे बरेच चित्रपट आहेत ज्या चित्रपटांनी आजवर मोठा पडदा गाजवला आहे. रुपेरी पडद्यावरचा असाच अजरामर झालेला एक चित्रपट म्हणजे आमच्यासारखे आम्हीच. चित्रपटाची कथा आणि त्याला अनुसरून झालेलं कास्टिंग हे इतकं परफेक्ट जमलं कि प्रत्येक पात्रांने आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटातील आजवर कोणाला माहित नसलेली बाब जी ऐकून प्रत्येकजण हा चित्रपट पुन्हा बघायची इच्छा व्यक्त करेल यांत शंका नाही. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री वर्षा ऊसगांवकर, अभिनेते सुधीर जोशी, अभिनेते विजय पाटकर या मंडळीने पडद्यावर दाखवलेली आपली जादू आज ही कमी झालेली नाही.
लग्नानंतर निवेदिता या अशोक सराफ यांच्या घरातल्याच एक झाल्या. त्यांनी सगळ्यांबरोबर जमवून घेत घरातील आपलं स्थान कमी दिवसातच स्थापित केलं. अशोक सराफांपेक्षा निवेदिता यांची त्यांच्या घरच्यांशी घट्ट मैत्री झाली. त्यांनतर अशोक मामांच्या घरची मंडळी येतात ती अशोक मामांच्या नव्हे तर निवेदिता यांच्या घरी येतात. अर्थात याला कारण त्यांचा स्वभाव आहे. निवेदिता सराफ ही व्यक्ती दुसऱ्यांच्या कलेनं घेणारी आहे. बोलकं व्यक्तिमत्व असलेल्या या निवेदिता सराफांच्या अगदी उलट अशोक मामांचा स्वभाव आहे. (nivedita saraf ashok saraf)
====
हे देखील वाचा- ‘आपली चूक मान्य करावी’ म्हणतं रितेशने धरले जिनीलियाचे पाय
====
गोष्ट प्रेमाची पण माणूस चुकला..
अशोक मामांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात एक किस्सा सांगितला, यांत ते म्हणाले निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या लग्नानंतर त्यांना वर्षभरात अनिकेत झाला. यापुढे म्हणताना त्यांनी लिहिलंय, ‘आमच्यासारखे आम्हीच चित्रपटाचं डबिंग चालू असतानाच्या काळात अनिकेतचा जन्म झाला. त्यामुळे या सिनेमातलं निवेदिताच डबिंग तिच्या बहिणीनं, मीनलन केले आहे. निवेदिता, मीनल आणि त्यांची आई या तिघींचा आवाज इतका सारखा आहे की फोनवरही अनेकदा फसायला होतं.
या पुढे एक किस्सा सांगताना अशोक मामा म्हणाले, लग्नाच्या आधी मी एकदा निवेदिताला फोन केला. त्यावेळी अर्थातच लँड लाइन होती. माझ्या प्रेमाच्या गोष्टी सुरू झाल्या आणि मध्येच समोरून शांत आवाज आला, ‘अहो, मी निवेदिताची आई बोलतेय. थांबा हं बोलावते निवेदिताला.’ अरे बापरे! असे म्हणत टेलिफोनसकट मी खाली पडायचा बाकी राहिलो!’

त्यांच्या या किस्स्याने आता पुन्हा एकदा ‘आमच्यासारखे आम्हीच’ चित्रपट बघायची इच्छा नक्की होईल, कारण निवेदिता ताईंचा आवाज हा त्यांचा नसून त्यांच्या बहिणीचा होता यावर विश्वास बसत नाहीय