अभिनेता सुव्रत जोशीने आजवर त्याच्या अभिनयशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सुरुवातीला मालिकांमधून सुव्रतने त्याच्या अभिनयाची छाप रसिक प्रेक्षकांमध्ये पाडली. त्यानंतर त्याने चित्रपटांमधूनही प्रेक्षकांची मन जिंकली. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी मध्येही त्याने स्वतःची अशी विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘ताली’ या आगामी हिंदी वेब सीरिजमध्ये सुव्रतनं काम केलं आहे. सुव्रतच्या आगामी वेबसीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सुव्रत सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. (Suvrat Joshi Video)
सुव्रतने आजवर त्याच्या भूमिकांमुळे जितका चर्चेत राहिला आहे तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. सुव्रत त्याची पत्नी सखी गोखलेबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो नेहमीच चाहत्यांसाठी शेअर करत असतो. सुव्रत कामानिमित्त त्याच्या मूळ घरापासून लांब आहे. सुव्रतची आई ही गोव्यात त्यांच्या घरी राहते. तर सुव्रत कामामुळे घरापासून दूर आहे. व्यस्त श्येड्युलमधून तो वेळात वेळ काढून त्याच्या घरी जात घरच्यांना वेळ देतो. अशातच अभिनेत्याने त्याच्या आईला वाढदिवसानिमित्त खास सरप्राइज दिलं.
सुव्रत त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त सरप्राइज म्हणून त्याच्या गोव्याच्या घरी गेला. झी गौरवचे शूटिंग करुन तो व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून तो त्याच्या आईकडे पोहोचला. दोन तासांची झोप आणि साडेदहा तासांची डाइव्ह करत तो त्याच्या आईकडे पोहोचला आहे. सुव्रतला अचानक आलेलं पाहून त्याच्या आईचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सध्या सुव्रतचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन देत लिहिलं आहे की, “कालच्या आदल्या दिवशी मी माझ्या आईला तिच्या वाढदिवशी सरप्राईज द्यायचे ठरवले, मुंबईहून गोवा बॉर्डरवर आमच्या घरी ड्रायव्हिंग करुन दोन तासांच्या झोपेसह साडेदहा तासांचा ड्राईव्ह करत निघालो. (मी झी गौरवचे शूटिंग करत असताना) या ३० सेकंदांच्या प्रतिक्रियेसाठी मोलाचा होता. महिला दिनानिमित्त या अत्यंत मौल्यवान क्षणाचा व्हिडीओ शेअर करत आहे कारण ती माझ्यासाठी या जगातील सर्वोत्तम महिलांपैकी एक आहे. आता तुम्हाला कळाले असेल की, अभिनयाचे हे बाळकडू माझ्या घरातूनचं मला मिळाले आहे. आणि मी तिच्यावर किती प्रेम करतो”.