गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सनी देओलने बॉडी बनवण्यासाठी चक्क लंडनवरुन मागवलं होतं दूध, सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “पूर्ण रुमच दुधाने भरली होती अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 11, 2024 | 7:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sunny deol body

सनी देओलने बॉडी बनवण्यासाठी चक्क लंडनवरुन मागवलं होतं दूध, सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, "पूर्ण रुमच दुधाने भरली होती अन्..."

बॉलिवूड अभिनेता सनी देओल मागील वर्षी ‘गदर २’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला होता. २००१ साली आलेल्या ‘गदर:एक प्रेम कहाणी’ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता जवळपास २२ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित केला गेला. दुसऱ्या भागातही सनी व अमीषा पटेल यांच्या जोडीला भरभरून प्रेम मिळाले. पण आता सनी आता कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. (Sunny deol on build body)

सनी आपल्या तब्येतीची खूप काळजी घेताना दिसतो. तो आपले जेवण, वर्कआऊट यावर पूर्ण लक्ष देत असतो. पण एकदा सनीने आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी थेट लंडनहून दूध मागवल्याचा खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा सनीचा मित्र व अभिनेता विंदू दारा सिंहने केला आहे. विंदूने सांगितले की, “सनी आपले वजन वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. त्यासाठी तो आपले जेवण व  व्यायामावरीही लक्ष देत होता. तेव्हा ‘बेताब’ या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी सनीने लंडनमध्ये प्रशिक्षण घेतले होते ज्यामुळे त्यांचे शरीर खूप वाढले होते”.

आणखी वाचा – राखी सावंतच्या पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या पत्नीचं लग्नानंतर बदललं आयुष्य, आता जगतये अशी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

पुढे तो म्हणाला की, “सनीला त्यावेळी लक्षात आलं की बॉडी बनवण्यासाठी खास काळजी घेणं गरजेचं आहे. सनीने लंडनमध्ये मसल्स बिल्ड केले होते. त्यामुळे ही लंडन बॉडी असल्याचे मी त्याला म्हणालो. दूध,पनीर खाऊन ही बॉडी बनली असल्याचेही मी त्याला सांगितले. पण जर भारतात गेलास तर ही बॉडी निघून जाईल आणि तसंच झालं. नंतर काही दिवसांनी सनी भेटला आणि मला म्हणाला की आता माझी तब्येत कमी होणार नाही. मी कसं काय? असं विचारलं. त्यावर तो मला खोलीमध्ये घेऊन गेला. त्या खोलीमध्ये भरपूर दूध होतं. जे त्याने लंडनवरुन मागवलं होतं”.

आणखी वाचा – नीता अंबानींनी घातला मुघल सम्राट शाहजहानचा ऐतिहासिक दागिना, लिलावामध्ये अंबानी कुटुंबियांना केला होता खरेदी, किंमत तब्बल…

सध्या सनी ‘लाहोर १९४७’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये निर्मित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर त्याचा मुलगा करण देओलही दिसणार आहे. करण याआधी ‘यमला पगला दिवाना २’, ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटामध्ये दिसला होता.

Tags: London from milkmilksunny deolsunny deol bodysunny deol movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Purva Phadke On Shiva

"माझ्या दोन्ही सासूबाईंचा बॉब कट अन्…", 'शिवा'ने खऱ्या आयुष्यातही कापले केस, नवऱ्याची काय होती प्रतिक्रिया?, म्हणाली, "सुरुवातीला बघताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.