रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या मालिकेमडून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले ‘राम’च्या भूमिकेतील अरुण गोविल व ‘सीता माते’च्या भूमिकेतून समोर आलेल्या दीपिका चिखलिया आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. पण यामध्ये अनेक कलाकार असे आहेत जे मनोरंजन क्षेत्रापासून लांब आहेत. त्यामधील एक नाव म्हणजे ‘कैकयी’च्या भूमिकेतून सर्वांच्या समोर आलेल्या पद्मा खन्ना. ‘रामायण’ मालिकेनंतर त्या फारशा कुठे दिसल्या नाहीत. सध्या त्या काय करतात हे आपण जाणून घेऊया. (actress padma khnna journy )
‘रामायण’ या मालिकेमध्ये पद्मा यांनी कैकयीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंतीही दर्शवली. पद्मा यांनी २००६ पर्यंत मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं पण नंतर त्या मनोरंजन क्षेत्रापासून लांब गेल्या. त्या गेल्या अनेक वर्षापासून अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या असून तिथेच त्या नृत्य शिकवतात. पद्मा यांच्या पतीचे निधन झाले आहे.

पद्मा यांनी नृत्याचे धडे घेतले आहेत. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांनी पंडित बिरजू महाराज यांच्याकडून कथ्थकचे धडे घेण्यास सुरवात केली. १२व्या वर्षी त्यांनी स्टेज परफॉर्मन्स करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी १९६२मध्ये भोजपुरी चित्रपट ‘गंगा मय्या तोहे पियरी चढइबो’ मधून अभिनेत्री म्हणून काम सुरू केले. तसेच ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटात कॅबरे डान्सर म्हणूनही दिसल्या. त्यांनी ‘पाकीजा’मध्ये मीना कुमारीच्या बॉडी डबल म्हणून काम केले आहे. १९८०मध्ये रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये कैकयीची भूमिका केली. त्यांच्या मते ही एक नकारात्मक भूमिका होती त्यामुळे सुरुवातीला त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला होता. पण रामानंद यांनी समजावले की, “रामायणामधील प्रेक्षक सर्व भूमिका विसरतील मात्र कैकयीला कधीही विसरणार नाहीत”. त्यानंतर त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिला. रामानंद सागर हे पद्मा यांच्या अभिनयाने प्रभावित होते.
पद्मा यांनी चित्रपट दिग्दर्शक जगदीश एल सिदाना यांच्याबरोबर लग्न केले. लग्नानंतर काही वर्षानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला आणि अमेरिकेत निघून गेल्या.