महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतील सगळेच कलाकार एकापेक्षा एक कमाल आहेत. कोकणचा कोहिनूर म्हणून प्रसिद्ध ओंकारने हास्यजत्रेतून एक्झिट घेतली असली तरी आजही त्याने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केलंय. हास्यजत्रेत असताना ओंकार आणि वनिता खरातच बॉण्ड ही अगदी खास होत. आज ओंकारचा वाढदिवस आहे आणि ओंकारच्या वाढदिवसानिमित्त वनिताची खास पोस्ट लक्षवेधी ठरतेय. हास्यजत्रेत असताना वनिता आणि ओंकारने नुसता कल्लाच केला होता. रील लाईफ प्रमाणे त्यांची रिअल लाईफ ही घट्ट मैत्री नेहमीच पाहायला मिळते.(vanita kharat onkar bhojane)
पहा ओंकारसाठीची वनिताची खास पोस्ट (vanita kharat onkar bhojane)
ओंकारच्या वाढदिवसानिमित्त वनिताने एक खास पोस्ट शेअर केलीय. आणि या पोस्टमध्ये वनिताने ओंकारसोबतचा एक मिठी मारतानाचा फोटो पोस्ट केल्या आणि हैप्पी बर्थडे भोज्या, लव्ह यु असं म्हणत हार्ट ईमोजी दिलीय. वनिता ओंकारला कायम भोज्या या नावानेच हाक मारते. या तिने ओंकारच्या खास पोस्टला #टॅलेंट दोस्त, #हँडसम आणि #लाखो दिलों की धडकन असे लिहिलंय. सोबत जग घुमेया हे गाणं तिने पोस्टला दिलंय. वनिताची ही पोस्ट विशेष लक्षवेधी ठरतेय.

संपूर्ण महाराष्ट्राला वेड करून सोडणाऱ्या ओंकारचा आज वाढदिवस आहे. कॉमेडी एक्सप्रेस आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या दोन कार्यक्रमांनी ओंकारला खरी ओळख दिली आहे.आज ओंकार महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत नसला तरी तो चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
====
हे देखील वाचा – “….और अविनाश भाऊ पिघलने लगा” नेटकऱ्यांची कमेंट चर्चेत
====
कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि ‘अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..’ या ओंकारच्या संवादाने समस्त प्रेक्षकांना वेड लावले. सरला एक कोटी चित्रपटात ओंकारने मुख्य भूमिका साकारली होती. शिवाय ओंकार ‘बॉईज २’, ‘बॉईज ३’, ‘घे डबल’ या चित्रपटातही झळकला होता. ओंकारने आता मोठ्या पडद्यावरील आपला वावर वाढवला आहे. (vanita kharat onkar bhojane)
याशिवाय ओंकारने नाटकविश्वातही चांगला ठसा उमटविला. सिनेसृष्टीत पाऊल टाकत ओंकार एकामागोमाग एक चित्रपट करण्यात व्यस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. ओंकार आगामी कलावती या चित्रपटात झळकणार आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ही सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे सुरु आहे.
