रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडील दारूच्या आहारी, लोकांची भांडी घासायची अन्…; ‘डान्स दिवाने’मधील वर्षा सोळंकीने सांगितली घरची परिस्थिती, प्रेक्षकांनाही अश्रू अनावर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 27, 2024 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Varsha Solanki on dance deewane show

वडील दारूच्या आहारी, लोकांची भांडी घासायची अन्...; ‘डान्स दिवाने’मधील वर्षा सोळंकीने सांगितली घरची परिस्थिती, प्रेक्षकांनाही अश्रू अनावर

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर समोर आले आणि त्यांना कलाक्षेत्रामधूनही प्रसिद्धी मिळाली. एकूणच काय तर सोशल मीडियामुळे अनेकांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे. त्यातील एक गाजलेले आणि सध्या सर्वांच्या परिचयाचे असलेले नाव म्हणजे वर्षा सोळंकी. गाऊनमध्ये सर्वांच्या समोर येणारी स्त्री ते आघाडीची मराठी इन्फ्लुएन्सर असा वर्षाचा प्रवास सर्वांनीच पाहिला आहे. कोणाचाही पाठिंबा नसताना तिने मनोरंजन क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण केले. तिच्या या प्रवासाचे सर्वांनाच कौतुक आहे. सध्या ती हिंदीतील एका डान्स शोमध्ये दिसत आहे. यामध्ये तिने आपला आतापर्यंतचा प्रवास सांगितला ज्यामुळे सर्वांचेच डोळे पाणावले. (Varsha Solanki on dance deewane show)

वर्षा सध्या ‘कलर्स वाहिनी’वरील ‘डान्स दिवाने ४’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहे. या कार्यक्रमादरम्याने वर्षाने आपले आजवरचे जीवन किती हालाखीचे होते हे सांगितले. ती म्हणाली की, “लहानपणापासूनच मला जबाबदारीची जाणीव झाली. माझे वडील खूप दारू प्यायचे आणि त्यामुळे त्यांचे घराकडेही दुर्लक्ष असे. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी माझ्या आईवर आली. आई लोकांच्या घरी भांडी घासायची त्यातून जे पैसे मिळाले त्यातून तिने मला आणि माझ्या बहिणीला वाढवले. जेव्हा आईला काम करायला जमायचे नाही तेव्हा मी किंवा बहीण भांडी घासायचो. असे दिवस काढत आम्ही मोठ्या झालो. आमची लग्न झाली. मला एक मुलगीही आहे”.

आणखी वाचा – गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा मोठा निर्णय, गरोदर आहे आई, लवकरच देणार बाळाला जन्म

View this post on Instagram

A post shared by Varsha Solanki (@varshasolanki202)

पुढे ती म्हणते की, “मला लहानपणापासूनच नाचायची आवड होती. पण जबाबदाऱ्या आल्याने सर्वच सुटले. पण जसे नवीन ॲप आले तेव्हा मी व्हिडीओ बनवू लागले. लोकांना हसवू लागले. एक दिवशी मला ‘कलर्स वाहिनी’कडून फोन आला आणि मला खूप आनंद झाला. हा मंच मिळाल्यामुळे माझी आवड मी जोपासू शकते”, असे तिने सांगितले.

आणखी वाचा – “स्त्रीला तिच्या शरीरावरुन बोलणं…”, गरोदरपणानंतर वाढत्या वजनावरुन सई लोकूरला हिणावलं, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “सी-सेक्शननंतर…”

तिच्या या प्रवासावर कार्यक्रमाचे परीक्षक सुनील शेट्टी यांना गहिवरून आले त्यांनी मंचावर जाऊन तिला धीर दिला. ते म्हणाले की, “तू लोकांना नुसतं हसवत नाहीस तर खूप हसवतेस. तू लोकांना शिकवतेस की पाण्यात पडल्याने माणूस बुडत नाही तर पाण्यात पडून राहल्याने बुडतो. तुम्ही पाण्यातून उठून बाहेर तर या तेव्हा तुम्ही पुढे जाल”, असे तिचे कौतुक केले. त्यानंतर वर्षा धावत माधुरीकडे गेली आणि त्यांना मिठी मारली.

Tags: dance showinfluencerMarathi influencerreailty showVarsha Solanki
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Actor Shyam Rajput lovestory

नीट कमाई नसल्यामुळे बायकोच्या घरच्यांना टेन्शन अन्…; श्याम राजपूत यांनी सांगितली त्यांची लव्हस्टोरी, म्हणाले, “माझ्या बायकोने…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.