गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्त्रीला तिच्या शरीरावरुन बोलणं…”, गरोदरपणानंतर वाढत्या वजनावरुन सई लोकूरला हिणावलं, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “सी-सेक्शननंतर…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 27, 2024 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sai Lokur replied to people trolling about post pregnancy body through Instagram story

"स्त्रीला तिच्या शरीरावरुन बोलणं…", गरोदरपणानंतर वाढत्या वजनावरुन सई लोकूरला हिणावलं, अभिनेत्री भडकली, म्हणाली, "सी-सेक्शननंतर…"

‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या शोमुळे सई चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. सई ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिच्या अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असते. गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झाले असून आई झाल्याची गुडन्यूज सांगत तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. नुकतीच तिने ‘बिग बॉस’मधील शर्मिष्ठा राऊत व मेघा धाडे या खास मैत्रिणींची भेट  घेतली याचा एक खास व्हिडीओही तिने शेअर केला होता.

अभिनेत्री आई झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पण यादरम्यान अभिनेत्रीला तिच्या शारीरिक बदलांवरुन काही लोकांनी वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर सईने आता सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “ज्या स्त्रीने नुकतेच एका बाळाला जन्म दिला आहे, त्या स्त्रीला तिच्या शरीरावरुन बोलणे यावर मला विश्वासच बसत नाही. त्या स्त्रीला पुन्हा तिचे वजन कमी करण्यासाठी आणि तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा वेळ तरी द्या.”

आणखी वाचा – “नेता ब्राम्हण म्हणून अपशब्द वापरले अन्…”, केतकी चितळेचा मनोज जरांगेंना अप्रत्यक्ष टोला, म्हणाली, “सर्कशीत असलेल्या कलाकारांवर…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे. जिथे तुमच्या शरीराचे ६ थर कापले जातात. या शस्त्रक्रियेनंतर खूप बंधने येतात. तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही ते करू शकत नाही, काहीही जड उचलू शकत नाही, वाकू शकत नाही, तुमच्या स्तनपानामुळे तुम्ही आहारही घेऊ शकत नाही. एका बाळाला जन्म दिल्यानंतर तुमचं शरीर अनेक व्यथांमधून जात असते आणि याकाळात एका स्त्रीला तिच्या शरीरावरुन बोलणे म्हणजे लज्जास्पद आहे”.

आणखी वाचा – Video : सिंधुदूर्गामधील स्वतःच्या गावी पोहोचले आदेश बांदेकर, नदीमध्ये पोहण्याचा आनंदही लुटला अन्…; व्हिडीओ व्हायरल

तर यापुढे सईने असं म्हटलं आहे की, “या प्रतिक्रियांनी मला आश्चर्य वाटले. पण देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो कारण मला तुमची खूप दया येते. जर लोक थोडे आणखी समजूतदार, आदराने, दयाळू राहिले, तर हे जग त्यांना राहण्यासाठी एक चांगले ठिकाण असेल.”

Tags: सई लोकुरमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newssai lokur
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Death

Video : वडिलांचं पार्थिव पाहताच ढसाढसा रडू लागली गायक पंकज उधास यांची लेक, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.