दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आज जरी या जगात नसला, तरी त्याच्या अनेक चाहत्यांच्या मनात तो आजही जिवंत आहे. सिद्धू मुसेवालाची काही गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यावर प्रचंड मोठा जनाक्रोष पाहायला मिळाला होता. त्यांचे अनेक चाहते आजही सिद्धू मुसेवालाच्या आठवणीत व्यथित होत असल्याचे पाहायला मिळते. अशातच आता गायकाच्या घरून एक आनंदवार्ता आली आहे.
दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्यांच्या कौटुंबिक सूत्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गायक सिद्धू मुसेवाला याची आई चरण कौर पुन्हा एकदा आई होणार असल्याचे समोर आले आहे. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंडियन एक्सप्रेसने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की मूसेवालाची आई चरण कौर गर्भवती आहे आणि लवकरच त्यांच्या कुटुंबात एक नवीन सदस्य सामील होणार आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या रिपोर्टनुसार, दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई पुढील महिन्यात आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मात्र, २९ मे २०२२ रोजी बिष्णोई गँगने गायकावर हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला.
त्यावेळी सिद्धू मुसेवाला अवघ्या २८ वर्षांचा होता. मात्र, त्याने आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. इतक्या तरुण वयात त्याने भरपूर प्रसिद्धीही मिळवली होती. सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूनंतर देशभरात खळबळ उडाली होती. अशातच आता त्याच्या आईच्या प्रेग्नंसीच्या बातमीने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.
सिद्धू मुसेवाला हा आपल्या आई-वडिलांचा एकलुता एक मुलगा होता. सिद्धूच्या पालकांनी या गरोदरपणाच्या वृत्तावर कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, कुटुंबीयांशी निगडीत असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर लवकरच बाळाला जन्म देऊ शकते.