बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व टायगर श्रॉफ हे त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. दोघांचीही एकत्रित भूमिका असलेला ‘बडे मिया छोटे मिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार असून या चित्रपटामध्ये अक्षय व टायगर दोघांचीही दमदार ॲक्शन पाहायला मिळणार आहे. नुकतेच दोघांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊ येथे हजेरी लावली होती. पण या प्रमोशनच्या कार्यक्रमाला गालबोट लागले. लोकांनी चप्पल, हेलमेट फेकले त्यामुळे पोलिसांना देखील लाठीचार्ज करावा लागला. नक्की काय घडले हे जाणून घेऊया. (Akshay Kumar and Tiger Shroff movie promotion)
लखनऊ शहरामध्ये चित्रपटाच्या प्रमोशन सोहळ्याप्रसंगीचे अक्षय व टायगरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, अक्षय व टायगरचा कार्यक्रम होणार आहे असे समजताच मोठ्या संख्येने चाहते जमा होऊ लागले होते. काही लोकांनी अक्षयला गाणे गाण्याची विनंती केली. अभिनेत्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहनही केले. पण गर्दी वाढतच गेली आणि काही वेळाने गर्दीमध्ये मारामारी होण्यास सुरवात झाली.चाहत्यांची विनंती पूर्ण केली नाही म्हणून मंचावर उभे असणाऱ्यांवर चप्पल फेकण्यास सुरुवात केली गेली.
https://x.com/Akkistaan/status/1762111022155137383?s=20Video: Our #BadeMiyanChoteMiyan grooving on the beats of #BadeMiyanChoteMiyanTitleTrack in Lucknow today.#AkshayKumar𓃵 #TigerShroff pic.twitter.com/KYW3AuKSiY
— Akshay Kumar 24×7 (@Akkistaan) February 26, 2024
फेकलेल्या चप्पल आणि इतर वस्तू अभिनेत्यांना लागल्या नाहीत पण मंचावर मात्र पडलेल्या दिसून आल्या. बिथरलेल्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी मात्र पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या सर्व प्रकारात परिस्थिती गंभीर झाली. ही परिस्थिती काही काळानंतर पोलिसांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात यश आले. योजलेला कार्यक्रम पूर्ण करण्याआधीच अभिनेत्यांना कार्यक्रमामधून काढता पाय घ्यावा लागला. दरम्याने घडल्या प्रकारावर अक्षय व टायगर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. या चित्रपटामध्ये अक्षय व टायगर व्यतिरिक्त पृथ्वीराज सुकुमारन्,सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर,अलाया एफ व रोनित बोस रॉय हे कलाकार दिसणार आहेत.