शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Pankaj Udhas Death : “सच्चा माणूस गमावला”, ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर गायकांना दुःख अनावर, सोनू निगमही हळहळला, म्हणाला, “तुम्ही आता…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 26, 2024 | 6:12 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died

"सच्चा माणूस गमावला", ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर गायकांना दुःख अनावर, सोनू निगमही हळहळला, म्हणाला, "तुम्ही आता..."

Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died : ज्येष्ठ गायक व गझलकार पंकज उधास यांच्या निधनाने संपूर्ण संगीतक्षेत्र व चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दीर्घ आजारपणामुळे त्यांनी वयाच्या ७२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीडिया वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. आज त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाचे वृत्त जाहीर करण्यात आले. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये गायक सोनू निगम तसेच अन्य कलाकारांनी पंकज यांचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंकज यांच्या समोर आलेल्या अचानक निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. सोनूने पंकज यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “माझ्या बालपणातील एक महत्त्वाची व्यक्ती आज आपल्यात नाही. श्री. पंकज उधासजी. तुम्ही आमच्या नेहमी लक्षात राहाल. तुम्ही आता नाही आहात या भावनेने मी तळमळत आहे. नेहमी माझ्याबरोबर राहिलात त्यासाठी धन्यवाद. ओम शांती”, असे लिहून त्याने आपले मन मोकळे केले आहे. सोनूच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आणखी वाचा – Pankaj Udhas Death : गझल गायक पंकज उधास यांचं निधन नेमकं कशामुळे झालं?, लेकीने पोस्ट शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती, निधनापूर्वी काय घडलं?

View this post on Instagram

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

तसेच गायक राहुल देशपांडे यानेही पंकज उधास यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “त्यांचा दयाळूपणा, प्रेम व करुणेने आम्हा सर्वांना मनापासून स्पर्श केलं आहे. त्यांचं संगीत आणि त्यांच्यातील सच्चा माणूस नेहमी स्मरणात राहील”, असे म्हणत त्याने श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर अनुप जलोटा यांनी, “संगीत क्षेत्रातील महान व्यक्ती आणि माझे मित्र पंकज उधास हे आपल्यात नाहीत. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबीय व प्रियजनांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करत आहोत” असं म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rahul Deshpande (@rahuldeshpandeofficial)

आणखी वाचा – लग्नाला कुटुंबियांचा विरोध, पत्नीचा धर्म वेगळा अन्…; फिल्मी स्टाइल होती पंकज उधास यांची लव्हस्टोरी, लग्न करुनही…

‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे प्यार आया है’ ‘और आहिस्ता’ अशी बहारदार गाणी पंकज उधास यांनी आपल्याला दिली आहेत. आजही ही गाणी प्रेक्षकांच्या ओठी आहेत. या गाण्यांचे बोल व पंकज यांचे सुर यामुळे सुरेल अशी गाणी प्रेक्षकांच्या मनात आजही राज्य करत आहेत.

Tags: Music legend Pankaj Udhas passes awayPankaj UdhasPankaj Udhas death Marathi NewsPankaj Udhas died
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Suresh Wadkar's Tribute to Veteran Gazal Singer Pankaj Udhas

"त्यांना कर्करोग होता हे...", ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर सुरेश वाडकर यांना मोठा धक्का, म्हणाले, "चालत-फिरत असताना..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.