बुधवार, मे 14, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पुण्यामधील वेताळ टेकडीवर नशेचा बाजार, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दाखवला गंभीर प्रकार, म्हणाले, “दोन मुली ड्रग्ज…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 25, 2024 | 1:28 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
pune drug racket

pune drug racket

तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याचे कित्येक धक्कादायक प्रकार कानावर येतात. असं काहीसं पुण्यामध्ये घडलं आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ४ हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं. पुणे शहरातील तरुण मंडळीही मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात असल्याची काही प्रकरणं समोर आली. अशामध्येच पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. आता पुण्यामधीलच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यामधील वेताळ टेकडीवर तरुण नशा करत असल्याचं उघडकीस आलं आहे. सुप्रसिद् अभिनेता व दिग्दर्शक रमेश परदेशी यांनी हे व्हिडीओ शेअर करत वास्तव सांगितलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पुण्यातील दोन महाविद्यालयात जाणाऱ्या मुली वेताळ टेकडीवर नशा करत होत्या. रमेश स्वतः तिथे गेले असता हा संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. दारू, बियर तसेच नशेच्या काही गोष्टी या मुलींकडे होत्या. त्यांना स्वतःचं भानही राहिलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये रमेश यांनी स्वतः या मुलींना रुग्णालयामध्ये नेलं. त्यांची प्रकृती गंभीर होती. दोघींनाही आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती ठिक असून घडलेला हा संपूर्ण प्रकार हादरवून सोडणारा आहे.

आणखी वाचा – Video : आई-सासूबाईंचा जबरदस्त डान्स, करवलीचा नखरा आणि भावंडांचा दंगा, पूजा सावंतच्या संगीत सोहळ्याचा Inside Video

रमेश यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “पुण्यामधील वेताळ टेकडीवर मी व्यायाम करण्यासाठी आलो होतो. याचदरम्यान महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या या दोन मुली बियर, नशेचं सामान घेऊन टेकडीच्या एका कोपऱ्यामध्ये बसल्या होत्या. या मुली फक्त महाविद्यालयामध्ये पहिल्या वर्षात शिकत आहेत. काल परवाच आपण पाहिलं की, पुण्यामध्ये चार हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं आहे. अशामध्येच माझ्या डोळ्यांसमोर मी ही घटना बघत आहे. या दोघींमध्ये दुसरीला काहीच शुद्ध नाही”.

आणखी वाचा – Video : राहुल वैद्यने जपली मराठी संस्कृती, लेकीला महालक्ष्मीच्या चरणी घेऊन गेला अन्…; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

पुढे ते म्हणाले, “आम्ही त्यांना टेकडीवरुन घेऊन खाली आलो. त्यांना रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. दोघीही आता सुखरुप आहेत. त्यापेकी एका मुलीचे पालकही आले आहेत. नशेचं हे भयावह दृश्य तसेच पुणे शहराची ही सध्याची परिस्थिती फारच बिकट आहे. पुणे शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी ही विनंती करतो की, अशा घटनांकडे आवर्जुन लक्ष द्या”. शिवाय रमेश यांनी पालकांनाही त्यांच्या मुलांकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं.

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainmentmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

vivek agnihotri slams bollywood
Entertainment

“त्याच्या तोंडावर वाईट बोलायची कोणाचीच लायकी नाही”, रणबीर कपूरचा उल्लेख करत भडकले विवेक अग्नीहोत्री, बॉलिवूडला दोष देत…

मे 14, 2025 | 1:46 pm
Operation sindoor soldier martyred
Social

चार महिन्यापूर्वी लग्न, सकाळी फोनवर बोलणं अन्…; शहीद जवान रामबाबू यांच्या गर्भवती पत्नीला पती गेल्याचं लपवून ठेवलं कारण…

मे 14, 2025 | 1:00 pm
Marathi Language Conflict Viral Video
Entertainment

पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्याला मराठीच बोल म्हणून जोडप्याची जबरदस्ती, हिंदीमध्येच बोलत पेटला वाद, क्षणात घडलं असं की…

मे 14, 2025 | 12:54 pm
Soldier Wife Passed Away
Entertainment

मुलगी झाली, बायको बाळंतपणातच गेली अन्…; तरीही सीमेवर भारतीय सैनिकाचा लढा, संसार उघड्यावर असूनही…

मे 14, 2025 | 11:55 am
Next Post
titeeksha tawde and siddharth bodke engagement

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचा साखरपुडा सोहळा संपन्न, अंगठीची डिझाइन आहे फारच खास, किस करतानाचा फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.