रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फेक अकाऊंट बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विद्या बालनची पोलिसांमध्ये धाव, एफआयआर दाखल, नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 21, 2024 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vidya Balan Filed FIR

फेक अकाऊंट बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विद्या बालनची पोलिसांमध्ये धाव, एफआयआर दाखल, नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक अन्…

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा सोशल मीडियावर खूप मोठा फॅन-फॉलोविंग आहे. विद्या बालनच्या अभिनयाचेही जगभरात चाहते आहेत. अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेत्री नेहमीच गमतीशीर व्हिडीओ शेअर करताना दिसते. सोशल मीडियावरील विद्या बालनचा बहुसंख्येने असलेला चाहता वर्ग पाहून तिच्यासारखे बनावट खाते तयार करुन कोणीतरी लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे. जेव्हा अभिनेत्रीला याची माहिती मिळाली तेव्हा तिने बनावट खात्याविरोधात एफआयआर दाखल केला. (Vidya Balan Filed FIR)

सोशल मीडिया व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात, कोणत्याही व्यक्तीचे बनावट खाते तयार करणे आणि त्याचा वापर फसव्या कारवायांसाठी करणे कठीण काम नाही. पण विद्या बालनसारख्या प्रसिद्ध कलाकारासह असे घडते तेव्हा सर्वसामान्यांच्या गोपनीयतेवरही प्रश्न निर्माण होतो. काही काळापूर्वी ‘फ्री प्रेस जर्नल’ने वृत्त दिले होते की, अज्ञात व्यक्तीने चुकीच्या कृत्यांसाठी विद्या बालनचे बनावट इंस्टाग्राम व gmail खाते तयार केले होते.

आणखी वाचा – अवाढव्य खर्च, शाही थाटमाट अन्…; दिव्या अग्रवाल-अपूर्व पाडगांवकर यांचा विवाहसोहळा संपन्न, नववधूच्या लूकची होतेय चर्चा

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

ही घटना अभिनेत्रीच्या एका जवळच्या व्यक्तीने तिच्या निदर्शनास आणून दिली. स्वतः विद्या असल्याचा दावा करणाऱ्या कोणीतरी तिला व्हॉट्सॲपवर मेसेज करुन संवाद साधला होता. विद्याच्या परिचितांनी तिच्याशी याबद्दल चर्चा केली तेव्हा अभिनेत्रीने लगेचच स्पष्ट केले की, तिने त्याच्याशी संपर्क साधला नाही किंवा ज्या क्रमांकावर तिच्याशी संपर्क साधला तो तिचाच होता.

आणखी वाचा – Ameen Sayani Passes Away : भारतीय रेडिओचा आवाज हरपला, अमीन सयानी यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन

अभिनेत्रीने माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (आयटी ॲक्ट) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी, १९ फेब्रुवारी रोजी, तिची व्यवस्थापक अदिती संधू यांच्यामार्फत, तिने बनावट Gmail ([email protected]) आणि Instagram खाते (vidya.balan.pvt) तयार करुन लोकांची फसवणूक केल्याबद्दल फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हेगार १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान विद्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत होता आणि नोकरीच्या ऑफरबाबत खोटी आश्वासने देत होता.

Tags: entertainmentvidya balanvidya balan complaintVidya Balan Filed FIR
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Dadasaheb phalke international film festival awards 2024 see the winners list

Dadasaheb Phalke Awards 2024 : सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला शाहरुख खान, तर बॉबी देओलचाही सन्मान, वाचा संपूर्ण यादी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.