शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…आणि धर्मेंद्र यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या खानाखालीच मारली, जॉनी लीवर यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “त्याच्या कानशिलात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 16, 2024 | 6:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
johnny lever on Dharmendra

…आणि धर्मेंद्र यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या खानाखालीच मारली, जॉनी लीवर यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “त्याच्या कानशिलात...”

बॉलिवूडमधील विनोदाचा बादशाह जॉनी लिव्हर ८०च्या दशकापासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून त्यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. सध्या जॉनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. जॉनी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कलाकारांबरोबर काम करतानाचे अनुभव सांगितले आहेत. यावेळी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ कलाकार धर्मेंद्र यांच्याबद्दलचा धमाकेदार किस्सा सांगितला. (johnny lever on Dharmendra)

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत जॉनी अगदी भरभरुन बोलत होते. धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. अशामध्ये मुलाखतीदरम्यान जॉनी यांनी धर्मेंद्रजींबद्दल एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “धर्मेंद्र हे ‘रिअल मॅन’ आहेत. धर्मेंद्रजी हे खूप धाडसी आहेत. ते जसे आतून आहेत तसेच ते बाहेरुनदेखील आहेत. ते खूपच चांगले असून त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात.” हे सांगितल्यानंतर धर्मेंद्रजींबाबतचा लिफ्टमधील एक प्रसंग त्यांनी सांगितला.

आणखी वाचा – रीलसाठी कायपण! भर मंडपात नवरदेवाने पत्नीच्या भांगात कुंकू लावताना बनवली फिल्मी स्टाइल रील, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

लिफ्टमधील प्रसंग सांगताना ते म्हणाले की, “धर्मेंद्रजी एकदा लिफ्टमधून जात असताना एक व्यक्ती त्यांच्याबरोबर होती. धर्मेंद्रजींना पाहून त्या व्यक्तीचा विश्वासच बसेना. तो व्यक्ती धर्मेंद्रजींना म्हणाला की, तुम्ही खरंच धर्मेंद्र आहात का? माझ्या डोळ्यांना विश्वासच बसत नाही. असे ऐकल्यानंतर धर्मेंद्रजींनी काहीही न बोलता त्याच्या कानशिलात लगावली आणि विचारलं, ‘आता बसला का विश्वास ?’ आणि ते लिफ्टमधून बाहेर पडले”. हा किस्सा सांगत जॉनी म्हणाले की, “धर्मेंद्रजी कोणालाही घाबरत नव्हते. धर्मेंद्र व विनोद खन्ना हे दोघेही धाडसी आहेत. त्यांच्या बिनधास्त वागण्यामुळे अनेकदा कोर्टाच्या वाऱ्यादेखील त्यांना कराव्या लागल्या”. जॉनी हे धर्मेंद्र यांचे मोठे चाहते असून त्यांचा ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट १५ वेळा पाहिला असल्याचे सांगितले.

आणखी वाचा – RRR चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर केके सेंथिलच्या पत्नीचे धक्कादायक निधन, अवयव निकामी झाले अन्…; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

या मुलाखतीमध्ये जॉनी यांनी गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभवदेखील सांगितला आहे. गोविंदाबरोबर जॉनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदासह काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. पण आता गोविंदा देखील आपल्या कामामध्ये खूप व्यग्र असल्याने भेट कमी होते असे त्यांनी सांगितले.

Tags: comedy actordharmendradharmendra lift incidencejohnny leverjohnny lever interviewjohnny lever on Dharmendra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shilpa Shetty on atta chakki

Video : शिल्पा शेट्टीला जात्यावर गहू दळताना पाहून नागालँडचे मंत्रीही भारावले, म्हणाले, “वाह जी वाह…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.