सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कांत राहत असतात. दरम्यान बरेच असे कलाकार आहेत जे नेटकऱ्यांच्या तावडीत सापडतात आणि ट्रोल होतात. दरम्यान या ट्रोलिंगला न जुमानता ही कलाकार नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती करतात. तर काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करताना दिसतात. अशातच एक मराठमोळी अभिनेत्री बरेचदा एका ट्रोलिंगची शिकार झालेली पाहायला मिळाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. (Hemangi Kavi Answers To Trollers)
हेमांगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. हेमांगीने तिच्या अभिनयाच्या जोरावरही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. स्पष्टव्यक्ती, रोखठोक अभिनेत्री म्हणून मराठी सिनेसृष्टीत हेमांगी कवी हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. एखाद्या विषयावर स्पष्टपणे भाष्य करण्यास वा सडेतोड उत्तर देण्यास ही अभिनेत्री मागे राहत नाही. हेमांगी तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या स्पष्टवक्तेपणा व बिनधास्तपणामुळेदेखील कायम चर्चेत असते.
हेमांगीला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले गेले आहे आणि तिनेही प्रत्येकवेळी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. अशातच तिला पुन्हा एकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. हेमांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, यांत ती एका मराठी जुन्या गणयावर ठेका धरताना दिसत आहे. हेमांगी अधूनमधून बरेच डान्सचे रील व्हिडीओ शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेली एक डान्स रील साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

हेमांगीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्या या व्हिडीओ शूटवरून तिला ट्रोलही केलं आहे. हेमांगी सध्या एका हिंदी मालिकेचं चित्रीकरण करत आहे. या मालिकेच्या सेटवरच मेकअप रुममध्ये तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “पाठी अडकवलेली जीन्स तरी बाजूला करायची”, अशी कमेंट करत अभिनेत्रीला डिवचलं आहे. यावर अभिनेत्रीने कमेंट करत असं म्हटलं की, “तू पुढे लक्ष दे”, यावर त्या युजरने पुन्हा कमेंट करत असं म्हटलं की, “माझं लक्ष तुझ्या डोळ्यांकडेचं असतं”, असं म्हटलं आहे.