शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महेश मांजरेकरांच्या लेकीने त्यांच्या राहत्या इमारतीमध्येच घेतलं स्वतःचं हक्काचं घर, म्हणाली, “मी व पप्पा…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 15, 2024 | 5:23 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actress Sai Manjrekar bought a house in the same building with her father

महेश मांजरेकरांच्या लेकीने त्यांच्या राहत्या इमारतीमध्येच घेतलं स्वतःचं हक्काचं घर, म्हणाली, "मी व पप्पा..."

मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. महेश मांजरेकर यांना सई, अश्वमी आणि सत्या ही तीन मुलं आहेत. यापैकी सई मांजरेकर हिने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मनोरंजन सृष्टीत तिची वेगळी ओळख निर्माण करत आहे. अभिनेता सलमान खानबरोबर ‘दबंग ३’ चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली.

एकेकाळी इन्व्हेस्टमेंट बँकर बनण्याचे स्वप्न पाहणारी सई मांजरेकर लहानपणी खूप अभ्यासू होती. त्यामुळे मनोरंजन सृष्टीत ती बऱ्यापैकी तिची वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. सई तिच्या चित्रपटांसह सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चर्चेत राहत असते. अशातच ती तिच्या आगामी ‘कुछ खट्टा हो जाये’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar)

या चित्रपटाच्या निमित्ताने तिने ‘नवभारत टाईम्स’ला एक मुलाखत दिली. यावेळी सईला “तुला मुलगी असण्याचा सगळ्यात जास्त अभिमान केव्हा वाटला? त्याचबरोबर मुलगी असल्यामुळे तिला कधी हिणवलं गेलं का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देत सईने असं म्हटलं की, “अलीकडे जेव्हा मी व पप्पा आम्ही एक बिल्डिंगमध्ये घर घेतले. तेव्हा मला खूप अभिमान वाटला. मी ते करू शकले याचा मला आनंद आहे”.

आणखी वाचा – “आईचा बैल आणि आता…”, अक्षरा-अधिपतीचा नवा रोमँटिक प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “मालिका फ्लॉप, तिला बाहेर काढलं आणि…”

तसेच यापुढे ती असं म्हणाली की, “मला माझ्या आई-वडिलांसाठी खूप काही करायचे आहे. मला एक दिवस आई-वडिलांना म्हणायचे आहे की, आतापर्यंत तुम्ही खूप काम केलं. त्यामुळे तुम्ही आता आराम करा आणि मी त्यांना सगळ्या ती सोईसुविधा देऊ शकते, त्या उंचीवर मला पोहोचायचे आहे.”

आणखी वाचा – १४ वर्षांचा संसार मोडला, १० वर्षांनी दुसरं लग्न अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुसऱ्या पत्नीवर गंभीर आरोप कारण…

दरम्यान, ‘कुछ खट्टा हो जाए’ या चित्रपटात सई गुरु रंधावाबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाची कथा ही रंजक असल्याचे ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. त्यामुळे सईचे अनेक चाहते तिच्या या आगामी चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.  

Tags: bollywood actressBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newssai manjrekarबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमीसई मांजरेकर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Sonalee Kulkarni success journey

“राजकारण्यांनी मला घर दिलं असं…”, चित्रपटसृष्टीमध्ये मिळणाऱ्या वागणूकीवर सोनाली कुलकर्णीचा संताप, म्हणाली, “फार वाईट…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.