शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चाहत्याला मारहाण, मोबाईल फेकून दिल्यानंतरही आदित्य नारायण स्वतःची चूक मान्य करेना, स्पष्टीकरण देत म्हणाला, “मी देवालाच…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 15, 2024 | 11:29 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aditya narayan on concert

चाहत्याला मारहाण, मोबाईल फेकून दिल्यानंतरही आदित्य नारायण स्वतःची चूक मान्य करेना, स्पष्टीकरण देत म्हणाला, "मी देवालाच..."

प्रसिद्ध गायक आदित्य नारायण हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे . काही दिवसांपूर्वी त्याच्या एका कॉन्सर्टमधील चाहत्याशी गैरवर्तन करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या प्रकारामुळे आदित्यवर अनेक स्तरातून टीका होत आहे. छत्तीसगढमधील आयोजित केलेल्या कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याच्या हातावर मारत त्याने त्याचा फोन फेकून दिला. हा व्हिडीओ व्हायरल होताच कॉन्सर्ट मॅनेजरने या संदर्भात स्पष्टीकरण दिले. (Aditya narayan on concert)

या स्पष्टीकरणामध्ये आयोजकांनी सांगितले की, “आदित्यचा लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना प्रेक्षकांमधील एक व्यक्ती सतत आदित्यच्या पायावर फोनने मारत होता आणि त्याचे पाय खेचत होता. या कृतीमुळे आदित्यला राग अनावर झाला व त्याने त्या व्यक्तीचा फोन घेऊन भिरकावला.” आदित्यच्या हातून हे कृत्य रागाच्या भरात झाले असेदेखील मॅनेजरने सांगितले. मॅनेजरच्या या स्पष्टीकरणानंतर आता आदित्यने स्वतः याबाबत मौन सोडले आहे.

आणखी वाचा – असंही प्रेम! लग्नानंतर अमृता देशमुखचं नवऱ्यासाठी खास व्हॅलेंटाईन डे सरप्राइज, ते पाहताच रडू लागला अन्…

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये झालेल्या सर्व प्रकारामुळे आदित्यला अनेक टीकांचा सामना करावा लागत आहे. या सर्व घटनेवर प्रतिक्रिया देताना आदित्य म्हणाला की, “खरं सांगू तर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, उत्तर द्यायचेच असेल तर मी ते देवाला देईन”, असे त्याने सांगितले. त्याच्या या प्रतिक्रियेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्यच्या या कॉन्सर्टमध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी होते.

छत्तीसगढच्या भिलाईमधील रुंगटा या महाविद्यालायात आदित्यचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. आदित्यच्या चाहत्यांनी या कॉन्सर्टला प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीमध्ये जो व्यक्ती स्टेजच्या जवळ उभा होता त्याने आदित्यचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले व त्याच्या पायावर मोबाईलने मारले. यावर आदित्यने रागाच्या भरात त्या व्यक्तीचा फोन फेकून दिला. पण आयोजकांच्या म्हणण्यानुसार तो सदर व्यक्ती जर त्या महाविद्यालायाचा होता तर आदित्यबद्दल तशी तकार करणे गरजेचे होते. पण त्या व्यक्तीने तसे काही केले नाही, असे देखील आयोजकांनी सांगितले.

आणखी वाचा – डिनर डेट, रोमॅंटिक अंदाज अन्..; लग्नानंतर प्रथमेश व मुग्धाने साजरा केला पहिला व्हॅलेंटाईन डे, फोटो व्हायरल

घडलेल्या सदर प्रकारानंतर आदित्यचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर नियमित सक्रिय असणाऱ्या आदित्यने त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केले. यामुळे आदित्यच्या कृतीवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.

Tags: Aditya NarayanAditya Narayan concertaditya narayan live concertaditya thowing phonereaction
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Next Post
Ankita Lokhande On Valentines Day

नवऱ्याशिवायच व्हॅलेंटाइन डे अन्…; एकमेकांपासून लांब आहेत अंकिता लोखंडे व विकी जैन, म्हणाली, "त्याने मला खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.