‘बिग बॉस’ मराठीमुळे चर्चेत आलेली एक जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धक म्हणून हे दोघेही सहभागी झाले होते. या पर्वात त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबूली दिली नव्हती. त्यानंतर अखेर एकदिवस साखरपुड्याचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं. (Amruta Deshmukh Prasad Jawade)
काही दिवसांपूर्वीच अमृता व प्रसाद यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी अमृता-प्रसादच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यांच्या लगणसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रेक्षकांनीही या फोटोंना पसंती दर्शविली. थाटामाटात लग्न केल्यावर अभिनेत्रीचं सासरी सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. लग्नानंतरही जोडी संसारात रमलेली पाहायला मिळाली. अनेकदा आलेलं सणवारही ही जोडी हौसेने साजरी करतानाही दिसली.
यानंतर या रोमँटिक कपलने त्यांचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे. मात्र प्रसाद-अमृताचा हा व्हॅलेंटाईन डे खूप खास होता. यादिवशी एकमेकांबरोबर नव्हते तरीही त्यांनी हा प्रेमाचा दिवस साजरा केला. अमृताने गोड असं सरप्राइज देत प्रसादला हटके शुभेच्छा दिल्या. सध्या अमृता तिच्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त सातारा येथे आहे. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन डे तिला प्रसादसह साजरा करता आला नाही. मात्र प्रसादला तिने याची जराही कमतरता भासू दिली नाही.
अमृताने त्यांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यांत अमृताने तिच्या काही मित्र मैत्रिणींची मदत घेत प्रसादासाठी एक डिनर डेट प्लॅन केली. यावेळी तिने प्रसादसाठी पुष्पगुच्छ, शर्ट असे खास गिफ्टही घेतले होते. दरम्यान व्हिडीओ कॉल करत अमृताने नवऱ्याला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. अमृताने दिलेलं हे खास सरप्राइज पाहून प्रसाद भावुक झालेलाही पाहायला मिळाला.