रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठा निर्णय! राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये बदल, इंदिरा गांधी व नर्गिस दत्त यांची नावे वगळली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 14, 2024 | 10:27 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Indira Gandhi and nargis dutt names removed from national film awards categories see the details

मोठा निर्णय! राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये बदल, इंदिरा गांधी व नर्गिस दत्त यांची नावे वगळली अन्...

मनोरंजन सृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या काही पुरस्कारांपैकी एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या श्रेणीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची एक अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये पुरस्कारांची रक्कम वाढवण्यात आली आहे. तर श्रेणींमध्ये बदल करण्यात आले आहेत. मोदी सरकारने नेमलेल्या समितीने कोरोना काळात ही चर्चा केली होती आणि एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी वाचा – “भारत देश…”, दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणूकीवर मराठी अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, “नुसते जय म्हणून…”

त्यामुळे सरकारने नेमलेल्या समितीनेच्या बदलांनुसार, आता सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्काराचा उल्लेख केवळ दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट म्हणून करण्यात आला आहे. तर राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलून राष्ट्रीय, सामाजिक व पर्यावरणाला प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म असे ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा – कॅन्सरवर मात केल्यानंतर चित्रपटात काम करण्याची संधी मिळण्याबाबत शरद पोंक्षे यांचं भाष्य, म्हणाले, “माझे केस, चेहरा…”

इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांची नावे वगळण्याचे नेमके कारण काय? याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अद्याप समोर आले नाही.  दरम्यान, दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी असणारे रोख पारितोषिक १० लाख रुपयांवरून १५ लाख रुपये इतके करण्यात आले. याशिवाय विविध श्रेणीतील सुवर्ण कमळ पुरस्कारांची बक्षीस रक्कम ३ लाख रुपये आणि रौप्य कमळ विजेत्यांसाठी २ लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या श्रेणीनुसार बक्षिसाची रक्कम ही वेगवेगळी होती. 

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kushal Badrike Valentine Special Post

"आपलंच जग…", 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त कुशल बद्रिकेची बायकोसाठी खास पोस्ट, एकत्र फोटो शेअर करत म्हणाला, "जगाशी संबंध…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.