रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणवीर सिंग व जॉनी सीन्सची ‘ती’ जाहिरात पाहून रश्मी देसाई भडकली, पोस्ट शेअर करत फटकारलं अन्…; म्हणाली, “मालिकांचा अपमान…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 13, 2024 | 5:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
rashami desai angry post

रणवीर सिंग व जॉनी सीन्सची 'ती' जाहिरात पाहून रश्मी देसाई भडकली, पोस्ट शेअर करत फटकारलं अन्…; म्हणाली, "मालिकांचा अपमान…"

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनयाबरोबरचं त्याच्या अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्याचा दिलखुलास स्वभाव अनेकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो तर काही वेळेस त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण सध्या तो प्रकाशझोतात येण्याचे कारण थोडे वेगळे आहे. सोशल मीडियावर रणवीर व जॉनी सीन्स यांची एक लैंगिक संबंधा (इरेक्टल डिसफंक्शन) संबंधित असलेली जाहिरात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या जाहिरातीला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतले असून अनेक सेलिब्रिटींनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाईने सोशल मीडियावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. (rashami desai angry post)

प्रसारित झालेली जाहिरात हिंदी मालिकेप्रमाणे बनवण्यात आली आहे. जाहिरातीचा लहेजा पाहता टेलिव्हिजन मालिकांची मस्करी करण्यात आल्याचे रश्मीचे म्हणणे आहे. याबद्दल व्यक्त होताना तिने भलीमोठी पोस्टदेखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की,”मी माझ्या करिअरची सुरवात प्रादेशिक चित्रपट व मालिकांमधून सुरु केली. इथे सामान्य माणसं मालिकांबरोबरच बातम्या, क्रिकेट व बॉलिवूड चित्रपट पाहतात. ही जाहिरात खूपच अनपेक्षित होती. जे लोक मालिका विश्वामध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे खूपच अपमानास्पद आहे.”

आणखी वाचा -पवित्रा पुनिया व एजाज खानच्या नात्यात दुरावा, २ वर्षांनी वेगळे झाल्याबाबत अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली, “५ महिन्यांपासून…

 तसेच पुढे ती म्हणाली की, “मालिकांमध्ये काम करणाऱ्यांना नेहमीच कमी लेखले जाते. येथील लोक खूप कष्ट करतात. मात्र अशा जाहिराती लहान पडद्यावर दाखवल्या जात नाहीत तर त्या मोठ्या पडद्यावर दाखवल्या जात्यात. अशा जाहिराती करुन मालिकांचा अपमान होत आहे त्यामुळे हा मालिका विश्वासाठी सुचकतेचा ईशारा आहे असे ती म्हणाली. मी स्वतः या जाहिरातीमुळे दुखावले आहे कारण मालिकाविश्वाने मला ओळख मिळवून दिली. आशा आहे की तुम्ही आमच्या भावनांचा आदर कराल”. रश्मी ही लहान पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रश्मी ‘बिग बॉस’ हिंदीच्या १३व्या सीजनमध्ये दिसली होती. सोशल मीडियावर देखील ती नेहमी सक्रिय असून आपल्या डान्स व अभिनयाचे रील शेअर करत असते.

आणखी वाचा -अभिनेत्री मल्लिका राजपूतचे निधन, घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

रणवीर व जॉनी एकत्र काम करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्वच सोशल मीडियावर ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली असून यावर मिम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. रणवीरने ही जाहिरात आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर केली होती. या व्हिडीओला २२.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Tags: advertisementjonny sinsranveer singhrashami desairaveer jonny advertisementsocial media
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mangesh Desai New Home

फुलांची नेमप्लेट, पारंपरिक अंदाज अन्…; मंगेश देसाईंनी घेतलं नवं घर, पत्नी, मुलासह केला नव्या घरात गृहप्रवेश

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.