पाकिस्तानी अभिनेत्री व शाहरुखच्या ‘रईस’ या चित्रपटातील त्याची सह अभिनेत्री माहिरा खान गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. माहिराने २०२३ मध्ये पाकिस्तानी व्यावसायिक सलिम करिमसह लग्नगाठ बांधली. तिचं हे दुसरं लग्न बरंच चर्चेत होतं. तिला पहिल्या पतीपासून मुलगाही आहे. आता पुन्हा एकदा माहिराच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. मायरा दुसऱ्यांदा गरोदर असल्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यासंदर्भातील एक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Mahira Khan Pregnancy)
माहिराचं प्रेग्नंसी तसेच ती बाळाला कोणत्या महिन्यामध्ये जन्म देणार याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. याबाबत एक पोस्ट सोशल मीडियाद्वारे समोर आली आहे. माहिराने मात्र अद्यापही यामध्ये कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नाही. लग्नानंतर माहिराने अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेतला आहे. पण आता आई होणार असल्याने तिने ब्रेक घेतला असल्याचं समोक आलं आहे.
२००९ मध्ये माहिराचे पहिले लग्न अली अस्करीसह झाले होते. लॉस अँजेलिसमध्ये २००६ मध्ये तिची ओळख अलीबरोबर झाली. एक वर्ष दोघांनीही एकमेकांना डेट केलं. डेट केल्यानंतर माहिरा-अलीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांच्याही नात्यामध्ये दुरावा आला. अखेरीस त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. माहिराचा अजलान हा १५ वर्षांचा मुलगा आहे. लग्न झाल्यानंतर दोन वर्षांतच अली व माहिरामध्ये मतभेद होऊ लागले. ८ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर २०२३ मध्ये माहिरा व सलीम यांचं थाटामाटात लग्न पार पडलं. सोशल मीडियावरदेखील लग्नाचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते. सलीम हा पाकिस्तानात यशस्वी व्यवसायिक आहे.
आणखी वाचा – मुस्लिम धर्माला फॉलो करत नाही सैफ अली खान, स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “धर्म मला…”
३९ वर्षाच्या माहिराने पाकिस्तानी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच बॉलिवूडमध्ये चित्रपटामध्येही ती दिसली आहे. तिच्याकडे नेटफ्लिक्सचे दोन प्रोजेक्ट होते मात्र तिने याला नकार दिल्याचे समोर आले आहे. प्रेग्नंसीमुळेच तिने या प्रोजेक्ट्सला नकार दिल्याची चर्चा आहे. प्रेग्नंसीच्या वृत्ताला माहिराने दुजोरा दिला नसला तरीही या पोस्टवर अनेकांनी शुभेछांचा वर्षाव केला आहे.