मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फुलांची सजावट, सोन्याची घंटा अन्…; अमिताभ बच्चन यांच्या घरामध्येही आहे राम मंदिर, नेहमी करतात पूजा, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 12, 2024 | 5:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amitabh Bachchan Home

फुलांची सजावट, सोन्याची घंटा अन्…; अमिताभ बच्चन यांच्या घरामध्येही आहे राम मंदिर, नेहमी करतात पूजा, फोटो व्हायरल

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुंबईतील जलसा या बंगल्याचे अनेक फोटो याआधीही शेअर केले आहेत. अशातच अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर जलसामधील मंदिराची एक झलक दर्शवणारी काही छायाचित्रे त्यांनी पोस्ट केली आहेत. अमिताभ यांनी ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसह त्यांनी ‘T4918 श्रद्धा (लाल ध्वज इमोजी) शिवजींना दूध अर्पण आणि तुळशीला जल अर्पण’ असं लिहिलं आहे. (Amitabh Bachchan Home)

अमिताभ यांनी ब्लॉगवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मंदिराच्या आत देव-देवतांच्या अनेक पांढऱ्या संगमरवरी मूर्ती पाहायला मिळत होत्या. ताज्या फुलांच्या हाराने हे मंदिर सजवण्यात आलं होतं. पांढऱ्या संगमरवरी स्टँडवर काळे शिवलिंगही ठेवले होते. शिवाय मंदिराच्या छताला सोन्याच्या घंटाही पाहायला मिळाल्या. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘जलसा’ या घरामध्ये रामाचे सुंदर मंदिर बांधले आहे. हे पाहून चाहत्यांमध्येही उत्साह पाहायला मिळाला.

आणखी वाचा – Video : मरणाच्या दारातून परतलेल्या श्रेयस तळपदेला स्टेजवरच रडू कोसळलं, आठवला ‘तो’ जीवघेणा प्रसंग, म्हणाला, “जे घडलं ते…”

T 4918 – आस्था ????????
दुग्ध अर्पण शिव जी पे, और जल अर्पण तुलसी पे pic.twitter.com/W6Y0vW1E4k

— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 12, 2024

काही फोटोंमध्ये अमिताभ बच्चन शिवलिंगावर दूध अर्पण करताना दिसत होते. तसेच बागेतील तुळशीच्या रोपालाही त्यांनी पाणी अर्पण केले. अनवाणी पायांनी त्यांनी ही भक्तीसेवा केलेली पाहायला मिळाली. रविवारी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर अनेक छायाचित्रे पोस्ट केली. अभिनेत्याला पाहण्यासाठी रविवारी त्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने चाहते जमले होते. ४१ वर्षांहून अधिक काळ अमिताभ त्यांच्या चाहत्यांना घराबाहेर भेट देत असतात.

आणखी वाचा – “रक्तात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना…”, समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होताच क्रांती रेडकर संतप्त, म्हणाली, “भीती कसली आणि…”

अमिताभ यांनी त्यांच्या घराबाहेर थांबलेल्या चाहत्यांना हात दाखवत त्यांची भेट घेतली. रविवारी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनही त्याचवेळी बाल्कनीत उभा असलेला दिसला. याआधी, अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये शेअर केले होते की, त्यांच्या चाहत्यांना भेटण्यापूर्वी ते नेहमीच बूट काढतात. चाहत्यांची भेट हे ते भक्ती मानतात. चाहत्यांची न थोपवणारी गर्दी नेहमीच अमिताभ यांच्या जलसा बाहेर असलेली पाहायला मिळते. जगभरात अमिताभ बच्चन यांचे लाखो आहेत.

Tags: amitabh bachchanAmitabh Bachchan HomeAmitabh Bachchan Home templeAmitabh Bachchan jalsaentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Shashank Ketkar New Project

करण जोहरच्या बिग बजेट सीरिजमध्ये शशांक केतकरची वर्णी, स्वतःच पोस्ट शेअर करत म्हणाला, "भूमिका लहान आहे पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.