कलाकार म्हटलं की कौतुक हे आलंच आणि त्याच्याच बरोबरीने टीकाही आली. तसंच कलाकार म्हटलं की चाहते अन् समर्थक हे आलेच आणि त्यांच्याच बरोबरीने टिकाकारही आलेच. सोशल मीडियाच्या या काळात टीका किंवा ट्रोलिंग करणे हे अगदी सहजसोपे झाले आहे. या टिकाकारांना काही कलाकार चोख प्रतिउत्तर देतात, पण काही कलाकार यावर व्यक्त होणे टाळतात. पण आपल्या आवडत्या कलाकाराच्या वतीने चाहतेमंडळी कायमच पाठिंबा देतात. असंच काहीसं अभिनेत्री तेजश्री प्रधानबरोबर झाला आहे.
स्टार प्रवाह वरील प्रेमाची गोष्ट ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये हे मोहब्बते’ या मालिकेचा हा रिमेक आहे. त्यामुळे या मालिकेची हिंदी मालिकेबरोबर कायम तुलना केली जाते. तसेच हिंदी व मराठी कलाकारांचीही कायम तुलना होते. असंच “तेजश्रीला अभिनय येत नाही” असं म्हणत एका नेटकऱ्याने तेजश्रीवर टीका केली. मालिकेतील सगळे कलाकार उत्तम अभिनय करतात. पण तेजश्रीला इशिताचा अभिनय जमत नाही असं म्हणत त्याने तेजश्रीच्या अभिनयावर टीका केली आहे.

दरम्यान नेटकऱ्याच्या या टीकेवर तेजश्री एका चाहत्याने असं उत्तर दिलं आहे की, “दिव्यांकाने तिची भूमिका चोखच निभावली होती. याबाबत कोणतेच दुमत नाही. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो आणि तेजू ताईकडे स्वतःच्या कामाचा अनुभव आहे. तिने दुसऱ्या कलाकाराची कॉपी का करावी? आणि मुळात कॉपी करायला ती इशिता नाही मुक्ताचं पात्र साकारतेय.”
आणखी वाचा – असा होता भारतीच्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस, अमिताभ बच्चन यांचे घरही दाखवले अन्…; खास व्हिडीओ केला शेअर
यापुढे त्या चाहत्याने असं म्हटलं आहे की, “या मालिकेतील बाकीचे ही कलाकारही कॉपी करतच नाहीत. त्यांची पात्र वेगळी आहेत आणि हो हा रिमेक आहे, पण पात्र, संवाद, दृश्ये हे पूर्णपणे मराठी प्रेक्षकांच्या दृष्टीने वेगळी आहेत आणि हाच धागा पकडून ही मालिका चालू आहे.”