शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि राहील…”, यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’च्या ट्रेलरने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 8, 2024 | 6:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Article 370 Official Trailer

"काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि राहील...", यामी गौतमच्या 'आर्टिकल ३७०'च्या ट्रेलरने वेधलं लक्ष

यामी गौतमने नुकतीच एक खुशखबर चाहत्यांसह शेअर केली आहे. अभिनेत्री आई होणार असल्याची आनंदाची बातमी तिने चाहत्यांसह शेअर केली आहे. या आनंदाच्या बातमीनंतर आता यामीबाबतची आणखी एक बातमी समोर आली आहे. यामी गौतमचा आगामी चित्रपट ‘आर्टिकल ३७०’ च्या ट्रेलरने काही वेळातच धुमाकूळ घातला आहे. देशाच्या सर्वात सुंदर भाग काश्मीरशी संबंधित कलम ३७०च्या ज्वलंत मुद्द्यावर आधारित ‘आर्टिकल ३७०’ चित्रपट अवलंबून आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आदित्य सुहास जांभळे यांनी सांभाळली असून यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातून ही अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावर खळबळ उडवणार असल्याचं चित्र ट्रेलरवरुन पाहायला मिळत आहे. (Article 370 Official Trailer)

‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिलं आहे की, “संपूर्ण काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि राहील. या ट्रेलरमध्ये यामी एका NIA अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे, ज्याला काश्मीरमध्ये कलम 370 नंतर शांतता प्रस्थापित करण्याची तसेच दहशतवाद्यांची मोहीम अयशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे”. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘रामायण’ या टीव्ही मालिकेतील रामची भूमिका साकारणारा अरुण गोविल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसत आहे. “आम्ही कलम ३७० आणू” असंही ते बोलताना दिसत आहेत.

आणखी वाचा – नागराज मंजुळेंच्या चित्रपटात संभाजीराजे छत्रपती साकारणार भूमिका, स्वतःच खुलासा करत म्हणाले, “फोन आला अन्…”

View this post on Instagram

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

ट्रेलरची सुरुवात काश्मीर खोऱ्याच्या नयनरम्य दृश्याने झाली. यामी गौतमचा आवाज येत ती असं बोलत आहे की, “काश्मीर एक हरवलेली केस आहे, मॅडम. जोपर्यंत हा विशेष दर्जा आहे तोपर्यंत आपण त्यांना स्पर्शही करु शकत नाही”. यानंतर स्क्रीनवर प्रियमणी दिसत आहे आणि यामी तिच्यासमोर असं म्हणताना दिसत आहे की, ‘ते आम्हाला कलम ३७०ला स्पर्शही करु देणार नाहीत’. यानंतर काही मुले हातात बंदुका घेऊन गुंडगिरी करताना दिसतात.

आणखी वाचा – “सासरी गेल्यानंतर मला…”, ईशा देओलने घटस्फोटापूर्वीच सांगितलेलं सासरी कशी मिळत होती वागणूक?, म्हणालेली, “त्यांच्याबरोबर राहायला गेले अन्…”

यामीने या चित्रपटाचे भारताच्या इतिहासातील एक साहसी अध्याय असे वर्णन केले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल आणि त्याच्या कामाचे कौतुक होईल, अशी आशा चित्रपटाचा ट्रेलर पाहून व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेत्री म्हणाली आहे की, “या चित्रपटाने तिला अशा भूमिकेत प्रवेश करण्याची संधी दिली जी तिला यापूर्वी कधीही मिळाली नव्हती”.

Tags: article 370article 370 kashmirarticle 370 official trailerarticle 370 trailerarticle 370 trailer yami gautam
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ravindra Mahajani was beating his wife she revealed in her book see the details

"दोघांचे संबंध असल्याचं...", स्वतःच्या मित्रावरुन पत्नीवर संशय घ्यायचे रवींद्र महाजनी, गश्मीरच्या आईचा गौप्यस्फोट, म्हणाल्या, "माझ्यावरचा विश्वास..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.