मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. सारेगमप लिटल चॅम्प्स या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मुग्धा व प्रथमेश यांच्या आवाजाचे लाखो चाहते दिवाने आहेत. दोघांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना कायमच भुरळ घातली. याशिवाय आमचं ठरलं म्हणत मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. यानंतर या जोडीने त्यांचा शाही लग्नसोहळा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. (Mugdha Vaishampayan education)
सध्या मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्नांनंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. दोघेही सोशल मीडियावरुन नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. चाहतेही मुग्धा व प्रथमेशच्या व्हिडीओला नेहमीच पसंती देताना दिसतात. बरेचदा दोघेही एकत्र गायनाचे धडे घेताना व धडे देतानाही दिसतात. तसेच जोडीने अनेक गायनाचे कार्यक्रमही घेतात. नुकताच मुग्धाने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुग्धाने मुंबई विद्यापीठातून पदव्यूत्तर शिक्षणात सुवर्ण पदक मिळवले आहे. मुग्धाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये मुग्धा तिची पदवी स्वीकारतानाचा फोटो पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या एका हातात प्रमाणपत्र व दुसऱ्या हातात सुवर्ण पदक असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय मुग्धाने आणखी एक फोटो शेअर केला आहे, या फोटोसह कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की, “माझा “मास्टर्स इन क्लासिकल वोकल – गोल्ड मेडल” पदवीप्रदान समारंभ Convocation hall, University of Mumbai, Churchgate इथे आज सकाळी संपन्न झाला. त्यानंतर लगेच मी कारंजाला (लाड) आले. आणि अगदी आजच्याच दिवशी श्री गुरुमंदिरामध्ये प्रथेप्रमाणे श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांसमोर गायनसेवा दत्तमहाराजांनीच करवून घेतली. अजून काय हवं? अशी पोस्ट तिने केली आहे.
मुग्धाने मुंबई विद्यापीठातून पदव्यूत्तर शिक्षणात सुवर्ण पदक मिळवल्यानंतर लगेचच गायनाच्या कार्यक्रमाची मिळालेली संधी तिच्यासाठी आनंदपर्व ठरलं. मुग्धाच्या या यशाच्या आनंदात तिचा पती प्रथमेशही सहभागी झालेला पाहायला मिळाला. बायकोच कौतुक करणारी पोस्ट त्याने शेअरही केली होती.