शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Grammy Awards मध्ये भारतीयांची बाजी, झाकीर हुसेन यांच्यासह शंकर महादेवन यांचाही सन्मान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 5, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Grammy Awards 2024

Grammy Awards मध्ये भारतीयांची बाजी, झाकीर हुसेन यांच्यासह शंकर महादेवन यांचाही सन्मान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Grammy Awards 2024 : ६६ वा ग्रॅमी अवॉर्ड सोहळा ५ फेब्रुवारी रोजी पार पडला. ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत जगतातील सर्वात मोठा अवॉर्ड मानला जातो. नुकताच या अवॉर्डचा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यात भारतीयांनी मानाचा तुरा रोवलेला पाहायला मिळाला. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा पार पडला. भारतातील दिग्गज संगीतकार व गायक शंकर महादेवन यांना मानाचा ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर तबलावादक झाकीर हुसेन व बासरीवादक राकेश चौरसिया यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संगीतकार व ग्रॅमी अवॉर्ड विजेते रिकी केज यांनी ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली. त्याने ही पोस्ट शेअर करत असे लिहिले की, “उस्ताद झाकीर हुसेन यांनी एका रात्रीत तीन ग्रॅमी जिंकून इतिहास रचला आहे. तर राकेश चौरसियांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. हे भारतासाठी ग्रॅमी अवॉर्डमधील सर्वोत्तम वर्ष आहे. या क्षणाचं मला साक्षीदार होता आलं, याचा आनंद आहे,” असं म्हणत त्याने हा आनंद सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.

आणखी वाचा – “आमच्या भावाचं नेमकं काय झालं हे…”, सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीला हवा आहे न्याय, अजूनही प्रकरण जैसे थे, म्हणाली, “आम्ही सीबीआयला…”

SHAKTI wins a #GRAMMYs #GRAMMYs2024 !!! Through this album 4 brilliant Indian musicians win Grammys!! Just amazing. India is shining in every direction. Shankar Mahadevan, Selvaganesh Vinayakram, Ganesh Rajagopalan, Ustad Zakhir Hussain. Ustad Zakhir Hussain won a second Grammy… pic.twitter.com/dJDUT6vRso

— Ricky Kej (@rickykej) February 4, 2024

याचबरोबर आणखी एक पोस्ट शेअर करत त्याने लिहिले आहे की, “शक्तीने ग्रॅमी अवॉर्ड जिंकला. या अल्बमसाठी चार भारतीय संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकले. खूप छान. भारत प्रत्येक दिशेने चमकत आहे. शंकर महादेवन, सेल्वागणेश विनायकराम, गणेश राजगोपालन, उस्ताद झाकीर हुसेन. उस्ताद झाकीर हुसैन यांनी तीन व सर्वोत्कृष्ट बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी अवॉर्ड्स जिंकले,” असं म्हणत सर्वांचं भरभरुन कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – गिरीजा प्रभूच्या नव्या घराबाहेरील आकर्षक नेमप्लेटने वेधलं लक्ष, कलाकारांकडून कौतुक अन्…; म्हणाली, “अखेर…”

…. and Ustad Zakhir Hussain, the living legend creates history by winning 3 Grammys in one night!!! Rakesh Chaurasia wins 2!! This is a great year for India at the Grammys.. and I am blessed to witness it. @RecordingAcad #indiawinsatgrammys

— Ricky Kej (@rickykej) February 5, 2024

ग्रॅमी अवॉर्ड्स २०२४ मध्ये भारतीय संगीतकारांनी छाप पाडलेली पाहायला मिळाली. या अवॉर्ड शोनंतर सर्वच स्तरातून विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

Tags: entertainmentgrammy awardsgrammy awards 2024shankar mahadevanzakir husen
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Bigg boss 17 Vicky jain comment on divorce with ankita lokhande and he said everything is fine between us see the details

"एकमेकांपासून वेगळं...", अंकिता लोखंडेबरोबर घटस्फोट घेण्यावरुन विकी जैनचं भाष्य, म्हणाला, "आमच्यामध्ये झालेलं भांडण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.