मनोरंजन विश्वातील अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे ही अगोदर तिच्या निधनाच्या बातमीमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर काल तिने तिच्या जिवंत असण्याच्या एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे ती नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचे कारण ठरताना दिसत आहेत. पूनम पांडेचे निधन झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. यावर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांकडून अभिनेत्रीच्या या खोट्या व चुकीच्या वागणुकीवर सडकून टीका करण्यात आली.
पूनम पांडेवर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता मराठमोळ्या अभिनेत्रीनेदेखील पुनमच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेने तिच्या सोशल मीडियावर पूनमवर सडकून टीका केली आहे. अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने असे म्हटलं आहे की, “मला खूपच राग आला. सोशल मीडिया हा खरंच आता एक विनोद बनला आहे! आजकाल सोशल मीडिया हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे लक्ष वेधून घेण्याचे कारण बनले आहे. कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचीही इथे चेष्टा केली जात आहे. कॅन्सर हा विनोद नाही आणि तो कधीही पीआर अॅक्टिव्हीटी असू शकत नाही. यातून जाणारे लोक आणि कुटुंबंच अशा घटनांची तीव्रता जाणतात.”

आणखी वाचा – Video : क्रांतीने रेडकरने असा साजरा केला आईचा वाढदिवस, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आईसारखे दैवत…”
यापुढे तिने म्हटले की, “मला आशा आहे की, ज्याने हे वाईट कृत्य केले आहे, त्या व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीला कधीच यातून जावे लागू नये. आपण सोशल मीडियापेक्षा आपल्या आयुष्याला अधिक गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली पाहिजे.”

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याने घेतले नवीन घर, दाखवली संपूर्ण झलक, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
तसेच यापुढच्या स्टोरीमध्ये तिने मीडियाबद्दल वक्तव्य करत असे म्हटले आहे की, “प्रसारमाध्यमांनो जर आपल्याकडे माणुसकी उरली असेल तर अशा लोकांना आणि त्यांचे स्वरूप आणि त्यांच्या जनसंपर्क अॅक्टिव्हीटीना कव्हर करणे थांबवा. अशा अमानवी लोकांवर बहिष्कार टाका. निःपक्षपाती, सत्यवादी, अस्सल माध्यमांवरील आमचा विश्वास पुनर्संचयित करा!”