मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे ही लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. ३१ जानेवारी रोजी या जोडीने विवाह करत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. गेल्या काही काळापसून ही दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाविषयी साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अशातच या जोडीने ३० जानेवारी रोजी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याविषयी अधिकृतपणे सांगितले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवानी-अजिंक्य ही विवाहबंधनातदेखील अडकले.
शिवानी-अजिंक्य यांच्या लग्नाचा शाही थाटमाट पाहायला मिळाला. दोघांच्या लग्नसोहळ्यातील लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवानीने लग्नासाठी खास फिकट गुलाबी रंगाचा सुंदर नक्षीकाम असलेला लेहेंगा परिधान केला होता, तर अजिंक्यने सफेद रंगाची शेरवाणी परिधान केली होती व डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटादेखील परिधान केला होता. त्यांच्या या लूकची चर्चा सुरू सन अनेकांना त्यांचा हा साधा तरीही साजेसा असा लुक सर्वांनाच आवडला असल्याचे सांगितले आहे.
अशातच शिवानीच्या मंगळसूत्रानेदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवानीने तिच्या लग्नात खास मंगळसूत्राची निवड केली असल्याचे पाहायला मिळाले. शिवानीने परिधान केलेल्या मंगळसूत्रात सोन्याच्या तारेभोवती काळे मणी गुंफलेले पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या मंगळसूत्राला दोन वाट्या असल्याचेदेखील पाहायला मिळत आहेत. मंगळसूत्रामध्ये काळे मणी व दोन वाट्या यांना फार महत्त्व दिले जाते. त्यामुळे शिवानीने तिच्या लग्नात पारंपरिक मंगळसूत्राची निवड केली. तसेच शिवानीचे ही मंगळसूत्र पारंपरिक असले तरी त्याची डिझाईन ही अगदी मॉडर्न वाटत आहे. त्यामुळे शिवानीचे मंगळसूत्र ही पारंपरिक असले तरी त्याला एक मॉडर्न टच असल्याचेदेखील अनेकांनी म्हटलं आहे.
शिवानी-अजिंक्य यांच्या लग्नाला त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक व मराठी मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळाले. झिम्मा २ या टीममधील अभिनेत्री सुहास जोशी, सायली संजीव व अभिनेता हेमंत ढोमे यांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. दरम्यान, शिवानी-अजिंक्य यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.