बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेहीने तिच्या डान्सने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नोराच्या दमदार डान्स व सौंदर्याने तिने चाहत्यांना अक्षरश: भुरळ घातली आहे. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या डान्स व अभिनयामुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हायरल व्हिडीओमुळे ती ट्रोलिंगची शिकार बनली आहे.
नोरा फतेहीने नुकतीच ‘डान्स प्लस प्रो’ या रिआलिटी शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये नोराने डान्स केला. पण तिचा हा डान्स पाहताच नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. नोराचा हा डान्स बघून शोमधील परीक्षकही अवाक् झाले. या व्हिडीओमध्ये नोरानं स्वतःवर पाणी ओतून डान्स केला असल्याचे दिसत आहे. नोराच्या या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
नोराचा हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिला खडेबोल सुनावले आहेत. या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये एकाने असं म्हटलं आहे की, “हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, याचं भान असूद्या” तर दुसऱ्याने “हा डान्स आम्हाला कुटुंबाबरोबर पाहता येणार नाही.” टर आणखी एकाने “माफ करा, पण माझा तुमच्याबद्दल असलेला सर्व आदर तुम्ही आता गमावला आहे, हा कसला घाणेरडा शो आहे?” अशा अनेक नकारात्मक कमेंट्स आल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या डान्सला ‘असभ्य’ व ‘अश्लील’ म्हणूनही संबोधले आहे.

दरम्यान, तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तिचा ‘क्रॅक’ हा चित्रपट येणार आहे. यात ती अभिनेता विद्युत जामवालबरोबर दिसणार आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.